Monday, August 24, 2026
Homeआरोग्यघनकचरा संकलन करण्याच्या ठेकेदारीत दोन-तीन नगरसेवक वगळता सत्ताधारी,विरोधकांचे एकमत.

घनकचरा संकलन करण्याच्या ठेकेदारीत दोन-तीन नगरसेवक वगळता सत्ताधारी,विरोधकांचे एकमत.

घनकचरा संकलन करण्याच्या ठेकेदारीत दोन-तीन नगरसेवक वगळता सत्ताधारी,विरोधकांचे एकमत.

कालचा राजकीय दांगडो म्हणजे यावलकरांची दिशाभूल.?

यावल      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    दि.२४   शहरातील ओला व सुका, घरगुती घातक कचरा घंटागाडीने संकलन करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पा पर्यंत पोहोचविण्याचा ठेका दिला जाणार असल्याने त्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी जाहीर निविदा २१ ऑगस्ट २०२६ रोजी काढल्याची तसेच हा ठेका एका ठेकेदाराला देण्यासाठी त्यात कोणाची हरकत येऊ नये म्हणून नगरपरिषदेतील विरोधी गटातील दोन-तीन नगरसेवक वगळता सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही नगरसेवकांचे एकमत झाल्याचे तसेच काल एस.टी. डेपोत झालेला राजकीय दांगडो हा यावलकरांची शुद्ध दिशाभूल होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातच सुरू झाली आहे.

२१ ऑगस्ट २०२६ रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांनी काढलेली जाहीर “ई” निविदा बघितली असता टेंडर मंजूर होण्याच्या आधीच दोन-तीन अटी शर्तीचे उल्लंघन करीत ठराविक ठेकेदाराला ठेका मिळण्यासाठी आणि दरमहा १०% दहा टक्के रकमेचा लाभ होण्यासाठी नगरपरिषदेतील २ ते ३ नगरसेवकाला डावलत विरोधी आणि सत्ताधारी गटातील काही सदस्यांचे एकमत झाल्याची चर्चा यावल शहरात आहे.

निविदा मधील अटी प्रत्यक्ष बघितले असता त्यात महत्वाचे स्पष्ट नमूद केले आहे की ( xxv ) नगरपरिषद पदाधिकारी / कर्मचारी यांच्या सोबत हितसंबंध नसल्याचा किंवा हिस्सा नसल्याचा परिशिष्ट
“अ” स्वयंघोषणापत्र १००/- मुद्रांक शुल्क पेपर वर नोटरी करुन सादर करावा. xxvi ) निविदाकारांची संस्था यांचे कोणतीही नगरपरिषदेबद्दल इतर थकबाकी नसल्याबाबत रु.१०० च्या मुद्रांक शुल्कावर प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
( निविदा मंजूर होण्याच्या आधीच या अटीचे उल्लंघन झाल्याने ठेकेदाराच्या नोटरी ला काही महत्व राहणार नाही.)

xxvii) सर्व कागदपत्र खरे असल्याबाबतचे रु.१०० च्या मुद्रांक शुल्कावर प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील.
xxviii) निविदेतील अटी व शर्ती मान्य असल्याचे व शासनाच्या कोणत्याही विभागाचे काळ्या यादीत नाव समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र.तसेच न.प.चे सदस्य, पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हितसंबंध
नसल्याचे रु.५०० च्या मुद्रांक शुल्कावर प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील.ऑनलाईन निविदा प्रसिध्द झालेनंतर NIT, Tender Documents, यासोबत डाऊनलोड करता येईल.निविदा दर भरणे कामी देण्यात येत आहे.त्याचा उपयोग दर भरताना करावा. २५) गटर साफसफाई बाबतचे नियोजन कृती आराखडा सादर करावा.
२६) वित्तीय बोली सादर करताना BOQ मधील ‘Part A’ आणि ‘Part B’ असे सादर करावयाचे आहेत Part A मध्ये
कामनिहाय / घटक निहाय भरावेत. तसेच Part B मध्ये कंपोस्ट खत प्रकल्प भाडे तत्वावर चालविणेसाठी
नगरपरिषदेस कंत्राटदाराकडून नगरपरिषदेस देण्यात येणारी रक्कम व न.प.तर्फे कंत्राटदारास उपलब्ध करुन दिलेल्या
वाहनांचे भाडे प्रती दिवस याप्रमाणे रक्कम भरावी. Part A आणि Part B असे दोन्ही मधील न भरल्यास तसेच संपूर्णबाबीचे वित्तीय दर व रक्कम न भरल्यास अथवा अर्धवट माहिती भरल्यास वित्तीय निविदा स्विकारल्या जाणार नाही.
एक कोटीची बँकेची चालू वर्षाची सॉल्वन्सी असणे आवश्यक असल्याची अट असल्याने यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांनी ही ज्याचक अट कोणत्या नियमानुसार आणि निविदेच्या कोणत्या शासकीय अटी शर्तीनुसार,कोणाच्या आदेशानुसार अट टाकली याबाबत इतर ठेकेदारी वर्तुळात चर्चा असून जाहीर निविदेमध्ये ठेकेदारांचा गोंधळ नको म्हणून आणि निश्चित केलेल्या ठेकेदाराला ठेका मिळावा म्हणून सदरची एक कोटीची सालव्हॅन्सवंशीची जाचक अट टाकण्यात आल्याची चर्चा ठेकेदारी वर्गात सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या