Wednesday, September 2, 2026
Homeगुन्हाजळगावात स्पा सेंटरवर दामिनी पथकाची धाड; ६ महिलांची सुटका, दोघांवर कारवाई !

जळगावात स्पा सेंटरवर दामिनी पथकाची धाड; ६ महिलांची सुटका, दोघांवर कारवाई !

जळगावात स्पा सेंटरवर दामिनी पथकाची धाड; ६ महिलांची सुटका, दोघांवर कारवाई !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील पिंप्राळा परिसरातील कुंटणखान्यावर झालेल्या कारवाईची चर्चा ताजी असतानाच, आता गणेश कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकल्याने शहरातील स्पा सेंटर चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंगरोडवरील एका अपार्टमेंटमध्ये अवैध पद्धतीने स्पा सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने या ठिकाणी काही दिवस पाळत ठेवत माहितीची खातरजमा केली. विशेष म्हणजे, पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने डमी ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची पडताळणी केली आणि त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांच्या सहकार्याने स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली. या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, मणिपूर, सिक्कीम आणि नेपाळ येथील महिलांचा समावेश आहे. त्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक आणि परवानाधारक नीरज सिंह पांड्या, तसेच जागेचा मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या