Wednesday, September 2, 2026
Homeजळगावसुकळीत गोडाऊनमध्ये भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक !

सुकळीत गोडाऊनमध्ये भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक !

सुकळीत गोडाऊनमध्ये भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक !

मुक्ताईनगर  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – तालुक्यातील सुकळी येथे मधुकर बळीराम नेहते यांच्या गोडाऊनमध्ये अचानक भीषण आग लागून मोठी हानी झाली. या आगीत सह्याद्री फ्रुट्स कंपनीचे केळी निर्याती साठी वापरण्यात येणारे लाखो रुपये किमतीचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच शेतीविषयक साहित्य, पीव्हीसी पाईप, ठिबक नळ्या आणि इतर सामानही आगीत भस्मसात झाले आहे.

गोडाऊनमध्ये संतोष उन्हाळे यांचे केळी भरण्यासाठी वापरले जाणारे बॉक्सही ठेवले होते. ते बॉक्सही पूर्णपणे जळून गेले. घटनास्थळी बोदवड नगरपंचायत आणि रावेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. अग्निश्मन दल आणि युवकांनीही शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. सध्या आग कशी लागली, याबाबत सध्या अधिक माहिती उपलब्ध नाही. मात्र आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पोलीस पाटील संदीप इंगळे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या