हतनूर धरणाचे २४ तर वाघुर धरणाचे चार दरवाजे उघडले
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तापी व वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दोन्ही नदया मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे अजंठा घाट लेणीच्या वाघूर नदीच्या उगमावर झालेल्या सतत धार पावसामुळे वाकोद ,नेरी तोंडापूर धरण ओव्हर फ्लो झाल्याने वाघूर धरण गेल्या चार-पाच दिवसात 80% वर पोहोचले होते दोनच दिवसा मध्ये धरण 100% भरल्याने सकाळी वाघुर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे
तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे पाटबंधारे विभागाने व जलसंपदा विभागाने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे

तसेच वांजोडी नदीलाही गेल्या आठ दिवसापासून पूर आला असून सर्व पाणी वाघूर नदीपर्यंत जात आहे व खाली शेळगाव धरणही फुल झाल्याने दरवाजा उघडण्यात येत आहेत तरी यावर्षी शेतकऱ्यांना मोठा रब्बीच्या हंगामाला पिण्याच्या पाण्याची समस्या मोठे दूर होणार आहे सध्या विहिरीत पुरेशे पाणी आले आहे अशी पाण्याची परिस्थिती झाली आहे तसेच गावाच्या आजूबाजू चे केटीवेअर बंद झाले जल जलसंधारण बंधारे ही सुद्धा तुंबून भरले आहे.तरी ऐन पोळया च्या दिवशी मोठा नदीला पूर आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे

