Wednesday, September 9, 2026
Homeजळगावगणेश चतुर्थीनिमित्त भुसावळ विभागातील PRS केंद्रांच्या वेळेत बदल

गणेश चतुर्थीनिमित्त भुसावळ विभागातील PRS केंद्रांच्या वेळेत बदल

गणेश चतुर्थीनिमित्त भुसावळ विभागातील PRS केंद्रांच्या वेळेत बदल

१४ सप्टेंबरला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आरक्षण काउंटर सुरू; आपत्कालीन सेवेसाठी निवडक काउंटर खुले

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांच्या कार्य वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी हा बदल लागू राहणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी भुसावळ विभागातील सर्व PRS आरक्षित तिकीट बुकिंग काउंटर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत नियमित आरक्षण काउंटर बंद राहणार आहेत.दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच आपत्कालीन आरक्षणाच्या गरजा पूर्ण करता याव्यात, यासाठी पुरेशा संख्येने PRS काउंटर आपत्कालीन कामकाजासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक प्रवाशांना आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.गणेश चतुर्थीच्या दिवशी रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आरक्षणाशी संबंधित कामासाठी स्थानकावर जाण्यापूर्वी PRS केंद्रांच्या सुधारित वेळेची नोंद घ्यावी, तसेच त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता, आरक्षणासाठी शक्यतो सकाळच्या वेळेतच नियोजन करणे प्रवाशांसाठी सोयीचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या