भुसावळच्या शिव कॉलनीत महिलांतर्फे सामूहिक हरतालिका पूजन उत्साहात संपन्न.
भुसावळ: खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील शिव कॉलनी परिसरातील महिलांनी आज, सोमवार रोजी सकाळी साडेसात वाजता एकत्र येत सामूहिक हरतालिका पूजन केले. या धार्मिक उत्सवाप्रसंगी पुरोहित मयूर जोशी यांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोपचार करून भाविक महिलांकडून पूजा संपन्न करून घेतली. या सामूहिक पूजनाच्या वेळी नगरसेविका डॉ.छाया देशमुख,उषा रहाने,प्रिया पाटिल, अश्विनी पाटील, भारती धंपाल,उषा धंपाल,जागृती पाटील,प्रिती महाजन,मिणा चौधरी,दिपाली पाटील यांच्या सह महीला भाविक उपस्थित होत्या. तसेच कॉलनीतील बहुसंख्येने उपस्थित महिलांनी या पूजनात सहभाग घेत पारंपरिक पद्धतीने हरतालिकेची विधीवत पूजा केली व उपवास केला.

