Monday, September 14, 2026
Homeजळगावसभासदांची काळजी घेणाऱ्या ग. स .सोसायटीचे सन्मा . अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारी...

सभासदांची काळजी घेणाऱ्या ग. स .सोसायटीचे सन्मा . अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे मनःपूर्वक आभार.

सभासदांची काळजी घेणाऱ्या ग. स .सोसायटीचे सन्मा . अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे मनःपूर्वक आभार….!
यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   दि.१४
जळगाव जिल्ह्यातील प्रचंड आर्थिक उलाढाल व सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या ग .स. सोसायटीची ११७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात संपन्न झाली….
या सभेसाठी जिल्हाभरातून आलेल्या सोसायटीच्या सन्माननीय सभासदांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून सन्माननीय कार्यकारी मंडळाने पुरेपूर काळजी घेतली होती… ? लाखो रुपयांच्या ठेवी सभासदांनी सोसायटीत ठेवलेल्या आहेत . याच्या मोबदल्यात सभासदांवर उपकार म्हणून सभेसाठी आलेल्या प्रत्येक सदस्याला १०००/ रु. उपस्थिती भत्ता देण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती….पावसाचे वातावरण असल्याने व कालपासूनच जिल्ह्यात पाऊस सुरू झालेला असल्याने सभासदांना थंड हवा व पावसापासून त्रास होऊ नये म्हणून उपस्थिती भत्ता वाटपाची विशेष व्यवस्था विद्यार्थ्यांच्या वाहनतळ असलेल्या (पार्किंग स्टॅन्ड ) मध्ये करण्यात आली होती. या ठिकाणी सभासदांच्या अंगावर माती व घाण उडू नये म्हणून विशेष अशी *चिखलाची* व्यवस्था करण्यात आली होती….. त्यासाठी पार्किंग स्टॅन्ड वरील पत्रांवर पडणारे पाणी बाहेर न जाऊ देता आत घेण्यात आले होते….उपस्थिती भत्ता घेतांना सभासदांनी गर्दी करू नये म्हणून विशेष चिखलाचे नियोजन केले होते. त्यामुळे चिखलात पडण्याच्या भीतीमुळे स्त्री आणि पुरुष सभासद अत्यंत शिस्तीत उपस्थिती भत्ता घेत होते. यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी व चेंगराचेंगरी न झाल्याने दिव्यांग , गरोदर महिला, आजारी सभासद , वृद्ध सभासद यांनी आनंद व्यक्त केला ….? उपस्थिती भत्ता घेताना सर्वत्र चिखल असल्याने सभासद अत्यंत शांत आणि शिस्तीत

 

उपस्थिती भत्ता घेत असल्याचे दिसले …? उपस्थिती भत्ता घेतांना सोसायटीने केलेल्या विशेष व्यवस्थेचे प्रत्येक सभासद कौतुक करत होता. *पाऊस असतानाही केलेली खास* *व्यवस्था सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र* झाली होती….दुसरे असे की , सभासदांनी मस्तपैकी पावसात भिजावे यासाठी कुठेही वॉटरप्रूफ मंडप न टाकता सर्वत्र मोकळे वातावरण निर्माण केल्याने प्रत्येक सभासद चिंब ओल्या पावसाने भिजून सभासदांची काळजी घेणाऱ्या आपल्या कार्यकारी मंडळाचे मनापासून आभार मानत होता… पावसाच्या पाण्यात सभासद भिजत असल्यामुळे पिण्याचे पाण्याची व्यवस्था टाळण्यात आली होती… सर्व सभासदांना या चिखल तुडविण्याच्या व्यवस्थेमुळे आपले बालपण आठवले आणि खेडकर वृत्तीने आनंदाने चिखलात उभे राहून सभासद सन्मा. कार्यकारी मंडळाला मनापासून धन्यवाद देत होते … एक दिवसासाठी सभासदांची जर सोसायटीचे कार्यकारी मंडळ इतक्या आदरभावाने व्यवस्था करत असेल तर नक्कीच सभासदांचे आर्थिक हित साधण्यात ते किती पुढे असेल ? या आनंदाने सभासद आपल्या खिशावर हात ठेवून बाहेर पडत होता…! अशी माहिती प्रत्यक्ष उपस्थित असलेले – प्रा. जतीन श्री .मेढे /भुसावळ यांनी दिली. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहे -९५४५०-७२६००

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या