Tuesday, September 15, 2026
Homeजळगावदिनांक १७ रोजी यावल तालुक्यात आठ महसूल मंडळात महात्मा ज्योतिबा फुले महसूल...

दिनांक १७ रोजी यावल तालुक्यात आठ महसूल मंडळात महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालत

दिनांक १७ रोजी यावल तालुक्यात आठ महसूल मंडळात महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालत

यावल.     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       दि.१५
नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न आणि अर्जांवर एकाच ठिकाणी जलद व तात्काळ तोडगा काढण्यासाठी यावल तालुक्यात ‘महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालत’चे भव्य आयोजन गुरुवार दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील सर्व आठ मंडळात करण्यात आले आहे.

तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मुख्यालयासह आठही महसूल मंडळाच्या मुख्यालयात या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

एकाच छताखाली महसुली प्रश्नांवर होणार तोडगा
सर्वसामान्यांना शासकीय कामकाजात सुलभता यावी, महसूल विभागाच्या विविध फेरफार,उतारे आणि दाखल्यांशी संबंधित तक्रारींचा निपटारा व्हावा,या हेतूने हे विशेष अभियान राबवले जात आहे.या लोक अदालतीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.

या ८ महसूल मंडळ मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजन तहसील कार्यालय, यावल मुख्यालया व्यतिरिक्त तालुक्यातील पुढील ८ महसूल मंडळ ठिकाणी ही लोक अदालत पार पडणार आहे यावल तालुक्यातील आठ महसूल मंडळे १ यावल,२ अंजाळे,३ भालोद,४) बामनोद,
५) फैजपूर, ६) किनगाव ७ ) साकळी ८) सावखेडासिम याप्रमाणे आहेत.
या कामांचा व अर्जांचा होणार जलद निपटारा:
फेरफार व सातबारा दुरुस्ती प्रलंबित फेरफार नोंदी प्रमाणित करणे,सातबारा व ८-अ मधील नावातील दुरुस्त्या.अतिक्रमण व रस्ते मोकळे करणे : शेत-रस्त्यांचे व पांदण रस्त्यांचे वाद मिटवून रस्ते मोकळे करणे.

विविध दाखले : उत्पन्न, रहिवासी, व इतर आवश्यक प्रशासकीय दाखल्यांचे वितरण.
शेतजमीन व सीमा वाद: जमिनीच्या मोजणी व हद्दीशी संबंधित अर्जांचा सामंजस्याने तोडगा.

संजय गांधी निराधार व इतर योजना : विविध शासकीय योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढणे.
नागरिकांना आवाहन:
“तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांनी आपल्या महसूल विषयक प्रलंबित कामांसाठी व अर्जांच्या समाधानासाठी संबंधित महसूल मंडळ मुख्यालयात उपस्थित राहून या ‘महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालत’चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन यावल तहसीलदार सौ.मोहन माला नाझिरकर व महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या