Tuesday, September 15, 2026
Homeजळगावरावेर राष्ट्रीय लोक अदालतीत ७७ प्रकरण निकाली व १५ लाख ४१ हजार...

रावेर राष्ट्रीय लोक अदालतीत ७७ प्रकरण निकाली व १५ लाख ४१ हजार वसुली

रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणा तर्फे दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता तालुका विधी सेवा समिती व वकील संघ रावेर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन दिवाणी व फौजदारी न्यायालय रावेर परिसरात आयोजित करण्यात आले याप्रसंगी न्यायाधीश श्री. एस.बी. तिवारी साहेब, न्यायाधीश श्री. व्ही व्ही. जटाळ साहेब तसेच रावेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धनराज ई. पाटील, उपाध्यक्ष ॲड. तुषार पी चौधरी, सचिव ॲड. के. बी. खान, सहसचिव ॲड. जितेंद्र दांडगे, पंच सदस्य ॲड. अमोल नाईक, सरकारी वकील निलेश लोखंडे तसेच ॲड. व्ही. पी. महाजन, ॲड. जमील शेख, ॲड. विपिन गडे, ॲड. योगेश गजरे, ॲड. सुभाष धुंदले, ॲड. जगदीश महाजन, ॲड. बी.डी. निळे, ॲड. प्रमोद विचवे. ॲड. जयंत तिवारी, ॲड. किशोर पाटील, ॲड. मिलिंद पाटील, ॲड. डि. डि. ठाकूर, ॲड. उदय सोनार,ॲड. लक्ष्मीकांत शिंदे, ॲड. आर.ए. पाटील, ॲड. रमाकांत महाजन ,ॲड. सलीम जामलकर, ॲड. तुषार माळी, ॲड. मेघनाथ, ॲड.अमोल कोंघे, ॲड. मुजाहीद शेख,ॲड. दिपक तायडे , ॲड. प्रदीप लहासे,ॲड. नितिन चौधरी, ॲड. एस. एन. सोनार, ॲड. संदेश पाटील, ॲड. दुर्गेश लहासे, ॲड. आनंद वाघोदे,ॲड. विनोद प्रल्हाद चौधरी, तसेच न्यायालयीन कर्मचारी सहा. अधिक्षक श्री. व्ही. एम. चौधरी, लघुलेखक श्री. एम. जे. शिंपी, वरिष्ठ लिपिक श्री. बी. के. तडवी, श्री. एस. पी. धारुरकर, श्री. डी. एस. डिवरे, कनिष्ठ लिपिक श्री. व्ही. ए. चौधरी, श्रीमती एस. आर. खुपसे, श्री. डी. आर. जावळे, श्री. ए. पी. सावदेकर, श्री. ए. के. काळे, श्री. बी. पी. महाजन, श्री. एम. टी. बावस्कर, शिपाई श्री. एन. एन. वाघ, श्री. बी. पी. चौधरी, श्री.एस.एल. रावते, विधी स्वयंसेवक श्री. सतिष श्रीराम पाटील पोलीस ऑफिसर्स आदी उपस्थित होते. सदर लोक न्यायालयामध्ये दाखल व दाखल पूर्व एकूण 77 पेक्षा जास्त प्रकरणे निकाली निघाली असून 15,41,870/- रुपयाची वसुली झाली.सदर लोकन्यायालया मध्ये झालेल्या सामोपचाराच्या तडजोडीअंती दुर्गा अनिल पुन्नासे व अनिल प्रल्हाद पुन्नासे रा. अंतूर्ली ता. मुक्ताईनगर यांच्यातील वाद मिटवून, त्यांचा विस्कटलेला संसार पुन्हा नव्याने मार्गी लावण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी उभय दाम्पत्यांचे कौतूक केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या