रावेर केळी पिक विमा व नुकसान भरपाई साठी शेतकऱ्याचे धरणे आंदोलन
रावेर. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर सुनिल कोंडे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुकाभरातील केळी उत्पादक तथा विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत नुकसान भरपाई व पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळण्यासाठी पाठिंबा दर्शविला.
गेल्या जून महिन्यात ०१ जून,०४ जून व ०६ जून रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे केळी उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी पंचनामे करण्यात आल्यानंतर यामध्ये सरकारी मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून होती.मात्र ०३ महिने उलटल्यावरही त्याबाबत कुठलाही शासन निर्णय होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. यासोबतच पीक विम्याचे मंजूर महसूल मंडळ अजूनही जाहीर केले नसून या सोबतच १४ हजार शेतकऱ्यांच्या पिकविमा मंजूर क्षेत्रात कमी क्षेत्र दाखवलेले असल्याने त्या संदर्भातील ही कुठलीही दुरुस्तीची माहिती पीक विमा कंपनीतर्फे दिली जात नाही. या सर्वांचा रोष म्हणून या सर्वांची त्रुटी दूर करून तात्काळ खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट मिळण्यासाठी रावेर येथे तहसील
कार्यालयासमोर धरणे आंदोलन कर यात आले.यावेळी तहसीलदार संजय तायडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पिक विमा तालुका कंपनी प्रतिनिधी मनोहर पाटील, वैभव पाटील, भगवान पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत पिक विमा कंपनीचे विभागीय प्रमुख श्री सोमेश देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून दिली त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत सर्व अडचणी दूर होतील असे आश्वस्त केल्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी आंदोलनास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धनंजय चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, माऊली हॉस्पिटलचे डॉ.संदीप पाटील, सी एस पाटील, शेतकरी संघटनेचे मधुकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिंधू पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाय एस महाजन,माजी तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील,डॉ सुरेश पाटील,बाजार समिती संचालक सोपान पाटील, गणेश महाजन, राजेंद्र चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील,निंभोरा माजी सरपंच डिगंबर चौधरी,गुणवंत भंगाळे,सुधीर मोरे,विवेक बोंडे, गिरीश नेहेते, योगेश कोळंबे, विष्णू भिरुड,सतीश पाटील,समाधान सावळे,दीपक महाजन,मोहन कचरे, गोपाळ भिरुड ,राकेश बऱ्हाटे, कन्हैया भारंबे, शेख नाजीम,रफिक शेठ, प्रफुल्ल बोंडे, किरण गाजरे, संजय गाजरे, राहुल टोके, भूषण महाजन, स्वप्नील गारसे, विनोद पाटील, प्रशांत बोरोले,ललित पाटील,उमाकांत महाजन,ललित भंगाळे, ॲड. जे जी पाटील,राजेंद्र धनगर,पंकज पाटील,प्रकाश पाटील,राकेश घोरपडे,मोहन बोंडे,राजेंद्र पाटील यांसह अन्य केळी उत्पादकांनी पाठिंबा दर्शविला.

