राज्यपालांच्या हस्ते शिवमुद्रा ढोल पथकाचा सन्मान; भुसावळचे नाव केले मोठे


भुसावळ : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शिवमुद्रा प्रतिष्ठान संचलित शिवमुद्रा ढोल पथकाने उत्तर प्रदेशच्या राज्यपालांसमोर दमदार वादन सादर करत भुसावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. पथकाच्या उत्कृष्ट वादनाने उपस्थितांची मने जिंकली.
या उल्लेखनीय वादनाची दखल घेत उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या हस्ते शिवमुद्रा ढोल पथकाचा भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व पदक देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान शिवमुद्रा प्रतिष्ठान तसेच भुसावळकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
शिवमुद्रा ढोल पथकाने आपल्या कला आणि पारंपरिक वादनाच्या माध्यमातून भुसावळचे नाव महाराष्ट्राबाहेर मोठे केले असून, भुसावळच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देशाच्या विविध भागांत पोहोचवली आहे. या कामगिरीबद्दल पथकातील सर्व वादकांचे आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

