Wednesday, September 23, 2026
Homeजळगावशहरासाठी नव्या पर्वाची पहाट: तब्बल ₹१० कोटींच्या विविध विकासकामांचा होणार शुभारंभ!

शहरासाठी नव्या पर्वाची पहाट: तब्बल ₹१० कोटींच्या विविध विकासकामांचा होणार शुभारंभ!

यावल शहरासाठी नव्या पर्वाची पहाट: तब्बल ₹१० कोटींच्या विविध विकासकामांचा होणार शुभारंभ!

लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांच्या प्रयत्नांना यश;

शहराचा चेहरामोहरा बदलणार

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      दि. २३
यावल नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला एक नवी दिशा आणि गती देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. निवडणूक काळात यावलकर नागरिकांना दिलेला विकासाचा शब्द आणि आश्वासने पूर्ण करत, नगरपरिषद हद्दीतील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी तब्बल ₹१० कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या सर्व मंजूर कामांचे भव्य भूमिपूजन लवकरच मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची सकारात्मक आणि आनंदाची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छायाताई अतुल पाटील यांनी दिली आहे.

नागरिकांच्या दैनंदिन गरजा, मूलभूत सुविधा,आरोग्य,क्रीडा, आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला प्राधान्य देत या विकासकामांची आखणी करण्यात आली आहे.

प्रमुख विकासकामे आणि मंजूर निधी:
१. मूलभूत सुविधा आणि पाणीपुरवठा
सातोद रोड परिसर: भव्य पाण्याची टाकी उभारणे – ₹२.२९ कोटी
स्वच्छ भारत मिशन: शहरात ५ विविध ठिकाणी आधुनिक शौचालय व मुतारी बांधकाम – ₹९५ लाख
वॉटर एटीएम: शहरातील प्रमुख ३ ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम – ₹१० लाख
स्वच्छता व्यवस्थापन: कचरा संकलन व प्रक्रिया प्रकल्पासाठी – ₹२ कोटी (प्रस्तावित)
२. रस्ते, डांबरीकरण व गटार बांधकाम
अक्सा नगर: रस्ता डांबरीकरण – ₹८० लाख
कृष्ण तारा नगर: डांबरीकरण रस्ता व गटार बांधकाम – ₹६० लाख
मदिना नगर: रस्ता व गटार बांधकाम – ₹६० लाख
बाबा नगर: गटार बांधकाम – ₹४० लाख
बालाजी सिटी: रस्ता व गटार बांधकाम – ₹२५ लाख
पांडुरंग सराफ नगर: डांबरीकरण व गटार बांधकाम – ₹२५ लाख
वाणी गल्ली: गटार बांधकाम – ₹२० लाख
खिन्नीपुरा: गटार बांधकाम – ₹२० लाख
पंडित नगर: डांबरीकरण करणे – ₹१५ लाख
दगडूशेठ सोनार ते डॉ. देशमुख घर रस्ता: गटार बांधकाम – ₹१० लाख
३. शिक्षण व क्रीडा क्षेत्राला पाठबळ (साने गुरुजी विद्यालय)
साने गुरुजी विद्यालय नवीन प्रवेशद्वार: नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण – ₹१० लाख
साने गुरुजी विद्यालय रंगकाम: शाळेचे नूतनीकरण व सुशोभीकरण – ₹२० लाख
ओपन जिम ( साने गुरुजी विद्यालय ): विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा – ₹११ लाख
इनडोअर जिम: शहरातील नागरिकांसाठी अद्ययावत जिम – ₹१५ लाख
४. संस्कृती, सौंदर्यीकरण व सामाजिक उपक्रम
यावल फैजपूर–यावल चोपडा रस्ता : सुंदर डिव्हायडर व सुशोभीकरण – ₹१० लाख
संत रूपलाल महाराज प्रवेशद्वार (बारी वाडा): भव्य सांस्कृतिक प्रवेशद्वार – ₹८ लाख
शेतकरी दांपत्य शिल्प: बळिराजाचा सन्मान करणारे आकर्षक शिल्प – ₹८ लाख
कलाकार कट्टा: स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ – ₹५ लाख
हरित यावल: शहरभर वृक्षारोपण मोहीम – ₹५ लाख
सामाजिक सेवा: शहरासह तालुक्यासाठी शववाहिनी व शवरथ खरेदी – ₹४० लाख (निविदा प्रक्रिया सुरू)
सांघिक प्रयत्न आणि मार्गदर्शनातून यश
हे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प मंजूर होण्यामागे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. अतुल वसंतराव पाटील,सर्व सहकारी नगरसेवक, तसेच न.प.मुख्याधिकारी,
बांधकाम अभियंता, पाणी
पुरवठा अभियंता आणि कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य व प्रशासकीय समन्वय राहिला आहे.
तसेच या कामांसाठी भरीव निधी व वेळेत प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांनी जळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभाग व सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
“निवडणुकीपूर्वी यावलच्या प्रत्येक नागरिकाला दिलेला शब्द पाळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. शहरातील मूलभूत समस्या सोडवून सौंदर्य आणि सुविधा वाढवण्यावर आमचा भर आहे. मंजूर कामांचे भूमिपूजन लवकरच होत असून, उर्वरित सर्व आवश्यक प्रकल्पांसाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.”अशी महत्वपूर्ण विकासात्मक माहिती
> — सौ. छायाताई अतुल पाटील (लोकनियुक्त नगराध्यक्ष, यावल) यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या