दहिगाव परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबल, विज तारा व साहित्य चोरणाऱ्या ४ आरोपींना अटक. संशयित ७ जण फरार.


यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२३
तालुक्यातील वीज कंपनीचा मुद्देमाल वीजतारा व इतर साहित्य चोरणाऱ्या चार आरोपींना यावल पोलिसांनी आज दि.२३ रोजी अटक केली असून सात संशयित आरोपी फरार आहेत.तालुक्यात अनेक वेळा शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबल वायरी स्टार्टर व इतर वीज कंपनीचे साहित्य चोरीस गेले आहे. याप्रकरणी आज दि.२३ चे रात्री साडेबारा वाजेचे सुमारास एक चार चाकी वाहन आणि दुचाकी वाहन घेऊन हे आरोपी किनगाव बुद्रुक – मालोद रस्त्यावर जात असताना किनगाव येथील ग्रामस्थांना आढळून आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.
चार आरोपींना केली अटक.
१) सुपडू हमजान तडवी वय 33 मालोद हल्ली मुक्काम
२) काजीपुरा सावदा तालुका रावेर करीम नशीर तडवी व 24 तडव वाडा नायगाव, ३) अल्लाउद्दीन मजीद तडवी वै 23 राहणार नायगाव,४) आरिफ युनूस मन्यार राहणार किनगाव बुद्रुक सोनार गल्ली. यांना अटक केली आहे आरोपी नंबर एक याने विविध कंपनीचे ॲलमिनियम तार व इतर साहित्य आरोपी नंबर चार ला विक्री केल्याची कबुली दिली आहे.याबाबत दहिगाव येथील अरुण पांडुरंग पाटील यांनी यावल पोलिसात फिर्याद दिली आहे की २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी तीन वाजेचे सुमारास पिकांना पाणी भरून घरी आलो पाणी भरल्यानंतर मी दुपारी चार वाजता घरी परत आलो दि.२२ रोजी सकाळी आठ वाजता पुन्हा शेतात गेले असता त्याचे दहिगाव चुंचाळे रस्त्यावरील शेतातील दहा फूट सुप्रीम कंपनीची सहा एम एम मापाची थ्रीकोर कापर १६०० रुपये किमतीची चोरून नेली तर अनिल भागवत बडे राहणार दहिगाव याचे दहिगाव शिवारातील शेत गट नंबर ३८४ ऑब्लिक दोन दोन मधील १५ हजार रुपये किमतीची १२० फूट फिनोलेक्स कंपनीची चार एम एम मापाची कॉपर केबल चोरीस गेली गौरव किशोर महाजन यांचे बोराडे शिवारातील शेत गट नंबर ७०/१ मधील दहा फूट फिनोलेक्स कंपनीची कॉपर चोरून नेली सुरेश विनायक राणे यांचे शेत गट नंबर ३७६ दहिगाव शिवारात १२० फूट फिनोलेक्स कंपनीची चार एम एम मापाची त्रिकोण कोपर १५ हजार ६०० पंचवीस रुपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली याबाबतची फिर्याद यावल पोलिसात दिल्यावरून यावल पोलिसात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपी नंबर एक याचे विरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. आता तालुक्यात अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एकूण ११ संशयीतांचा समावेश असून ४ संशयीतांना अटक केली आहे. आणि ७ लोक अद्याप मिळून आलेले नाहीत. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नायक अमित तडवी हे करीत आहेत.

