Friday, September 25, 2026
Homeजळगावस्वस्त धान्याची विल्हेवाट नेमकी कोणाकडून? भुसावळ–कुऱ्हा मार्गावरील धान्य वाहतुकीच्या चित्रफितीने पुरवठा विभागासमोर...

स्वस्त धान्याची विल्हेवाट नेमकी कोणाकडून? भुसावळ–कुऱ्हा मार्गावरील धान्य वाहतुकीच्या चित्रफितीने पुरवठा विभागासमोर गंभीर प्रश्न !

स्वस्त धान्याची विल्हेवाट नेमकी कोणाकडून?
भुसावळ–कुऱ्हा मार्गावरील धान्य वाहतुकीच्या चित्रफितीने पुरवठा विभागासमोर गंभीर प्रश्न !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – स्वस्त धान्याची विल्हेवाट नेमकी कोणाकडून ? असा सवाल आता भुसावळ परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. भुसावळ येथून स्वस्त धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनातून जामनेर रोडवरील कुऱ्हा पानाचे परिसरातील जळगाव नाका परिसरात उभ्या वाहनातून धान्याचे वितरण होत असल्याचे दिसणारी एक चित्रफित नागरिकांच्या माहितीसाठी समोर आली आहे.विशेष म्हणजे हा परिसर भुसावळ व जामनेर विधानसभा कार्यक्षेत्राच्या संदर्भात येत असल्याने या प्रकाराची पुरवठा विभागाने निष्पक्षपणे प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

त्या ठिकाणी अधिकृत स्वस्त धान्य दुकान आहे का?

समोर आलेल्या चित्रफितीत वाहनातून धान्य घेऊन जाणारे लाभार्थी दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, ज्या ठिकाणी धान्याचे वितरण होत असल्याचे दिसते, त्या ठिकाणी अधिकृत रास्तभाव दुकान आहे का?जर ते अधिकृत दुकान नसेल, तर तेथे धान्य वितरण कोणाच्या आदेशाने किंवा कोणत्या व्यवस्थेअंतर्गत झाले ? वाहन कोणत्या अधिकृत गोदामातून निघाले ? वाहनाचा क्रमांक, वाहतूक परवाना,चलन, धान्याचा प्रकार व प्रमाण आणि संबंधित वितरण नोंदी काय आहेत ? याची तपासणी होणे आवश्यक आहे.तसेच चित्रफितीत धान्याची गोणी घेऊन जाणारी व्यक्ती नेमकी कोणत्या रास्तभाव दुकानाची आणि कोणत्या रेशनकार्डाची लाभार्थी आहे, याची अधिकृत नोंद तपासल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

‘स्वस्त धान्य खरेदी करणारी टोळी’ असल्याचा दावा; प्रशासनाने सत्य तपासावे

भुसावळ परिसरातील काही नागरिकांकडून आणखी एक गंभीर बाब सांगितली ज

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या