Thursday, September 24, 2026
Homeजळगावश्री गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी पोलिसांचा रूटमार्च

श्री गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी पोलिसांचा रूटमार्च

श्री गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी पोलिसांचा रूटमार्च

फैजपूर :खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

गेल्या सप्ताहापासून फैजपूर शहर तथा परिसरातील गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला गणेशोत्सव विविध गणेश मंडळांनी विविध कार्यक्रम आयोजित करून शांततेत साजरा केलेला आहे. आता गणपती विसर्जनासाठी शिस्त व कायद्याचे पालन करून मिरवणुकीचा मार्ग तथा पोलिसांनी दिलेल्या नंबर नुसार कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च केला. दिनांक 25.09.2026 रोजी फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील फैजपूर, बामणोद, अकलुद, कासवा, चिखली बु ,चिखली खू. भोरटेक गावात एकूण 37 गणेश मंडळाचे श्री गणेश विसर्जन होणार आहे.


या मिरवणुकीच्या बंदोबस्त कामी फैजपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील, दोन पोलीस उपनिरीक्षक, 28 पोलिस अंमलदार, 30 होमगार्ड, पोलीस मुख्यालयाकडील स्ट्राइकिंग फोर्स असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सदर बंदोबस्ताच्या अनुषंगाने फैजपूर शहरात तसेच बामणोद येथे रूट मार्च घेण्यात आलेला आहे.
गणेश भक्तांनी आनंदात व जल्लोषात बाप्पांना निरोप द्यावा असे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनी आवाहन केले असून कायदा व सुव्यवस्थेचे सर्वांनी पालन करावे असे सांगितले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या