सदगुरू सदस्य यांच्यातर्फे निर्माल्य संकलन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड मार्फत अनंत चतुर्दशी निमित्त तापी नदीकाठी निर्माल्य संकलन करण्यात आले

सालाबादप्रमाणे दिनांक 25 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने तापी नदीकाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे मार्फत पद्मश्री महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला सदर उपक्रमात भुसावळ शहरातील तापी नदीवरील पुलाच्या चारही बाजूंना भुसावळ व यावल तालुक्यातील 448 श्रीसदस्यांद्वारे 5287 घरगुती गणेशमूर्ती व मंडळांचे निर्माल्य संकलन करण्यात आले.

या उपक्रमात एकूण सात ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन करण्यात आले. या निर्माल्याचे लागलीस श्री सदस्यांद्वारे विलगीकरण करून त्यातील 18 टन निर्माल्य वृक्षांना खत निर्मिती करण्यासाठी श्री समर्थ बैठक अट्रावल येथे पाठवण्यात आले. उरलेल्या निर्माल्याचे स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार विल्हेवाट करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी देखील विश्वासाने आपल्या जवळील निर्माल्य श्री सदस्यांकडे देत उपक्रमास सहकार्य केले. त्याचप्रमाणे बऱ्याच नागरिकांनी स्वतःहून यापुढे निर्माल्य प्लास्टिक बॅगमध्ये संकलित करणार नाही असा स्वैच्छिक संकल्प केला. उपस्थित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत करण्यात आलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली.

