भुसावळ शहरात तीन लाखाच्या नकली नोटा जप्त.

भुसावळ, रावेर, जळगाव शहरात नकली नोटांचे रॅकेट गोपनीय पथकाला लागले काम.
भुसावळ शहरात काल बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ३ लाखाच्या नकली नोटा आरोपीतांसह जप्त करण्यात आल्याचे प्रकरण भुसावळ पोलिसांनी उघडकीस आणल्याने तसेच नकली नोटांचे जाळे रावेर,भुसावळ,जळगाव सह जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी कुठे कुठे पोचले आहे याचा शोध घेण्यासाठी भुसावळ गोपनीय पोलीस विभागाला मोठे काम लागले असून या नकली नोटांच्या रॅकेट मागे खरा सूत्रधार कोण आणि कुठला..? आणि याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.
याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की दि.४ सप्टेंबर
२०२४ रोजी संध्याकाळी ८:४० वा. सु. इसम नामे 1) सैय्यद मुशाईद ऑअली मुमताज अली रा. उस्मानीया पार्क शिवाजी नगर जळगाव हा त्याचा साक्षीदार 2) नदीम खान रहीम खान सुभाष चौक शनी पेठ १० नंबर शाळा जळगाव याचेसह एकुण ३ लाख रु. किमतीच्या ५००/- रु दराच्या

६०० बनावट भारतीय चलनी नोटा त्यांचे कब्ज्यात बाळगुन त्यांचे ताब्यातील होन्डा कंपनीची ड्रिम युमा मोटर सायकल क्र.एम एच १९ सि डि ५४०३ हिच्यावर वाहतुक करुन वितरीत करण्यासाठी भुसावळ शहरात येणार आहेत. बाबतची विश्वसनीय माहीती भुसावळ बाजारपेठचे पोलीस
स्टेशनचे पो.नि.राहुल वाघ यांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे डि बी पथकातील पोलीस स्टाफसह सापळा रचला असता इसम नामे अब्दुल हमीद कागल
रा. रसलपुर रोड अब्दुल हमीद चौक रावेर हा सदरच्या बनावट भारतीय चलनी नोटा विकत
घेताना मिळुन आला. करीता आरोपी नामे 1) सैय्यद मुशाईद अली मुमताज अली रा. उस्मानीया पार्क शिवाजी नगर जळगाव हा त्याचा साक्षीदार 2) नदीम खान रहीम खान सुभाष चौक शनी पेठ 10 नंबर शाळा जळगाव, 3) अब्दुल हमीद कागल रा. रसलपुर रोड अब्दुल हमीद चौक रावेर अश्यां विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे सि सि टी एन एस गुन्हा रजी नं ३६५/२०२४ भा. न्या. सं. क.१७९, १८०, ३ ( ५ ) प्रमाणे दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी दाखल करण्यात आलेला आहे. तसेच चौकशी

दरम्यान यातील आरोपीतांवर जळगाव एमआयडीसी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव शहर पोलीस स्टेशन मलकापूर पोलीस स्टेशन इत्यादी दाखल गंभीर गुन्ह्यांची माहीती मिळाली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ कृष्णांत पिंगळे,भुसावळ बाजार पेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू सांगळे,पोहेका विजय नेरकर, निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी,अमर अढाळे,दिलीप कोल्हे,राहुल वानखेडे,भूषण चौधरी, केली आहे. सदर पुण्यातील आरोपी यांचे ताब्यातून एकूण तीन लाख रुपये अस्थक करून वरील आरोपींना सदर होण्याचे तपास कामी अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही आणि तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.
या नकली नोटांच्या रॅकेट मागे रावेर लोकसभा मतदारसंघात तसेच भुसावळ विभागात आणि जळगाव जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी कुठे कुठे आहे तसेच यामागील खरा सूत्रधार कोण याबाबतचे उत्सुकता आता जनतेला लागली आहे. आरोपींनी नकली नोटा कुठे कुठे चलनात आणल्या इत्यादी चौकशी चे काम सुद्धा भुसावळ पोलिसांना लागले आहे.

