खान्देशचा आवाज काश्मीरच्या नंदनवनात गुंजणार. महाराष्ट्रातून तुषार वाघुळदे यांची काश्मीरमध्ये होणाऱ्या ‘पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलना’च्या प्रमुख निवेदक (अँकर) म्हणून निवड
जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी श्रीनगर (काश्मीर):-
काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘पहिले राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलन २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.हे संमेलन 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत होईल.या राष्ट्रीय पातळीवरील भव्य व दिमाखदार संमेलनाचे मुख्य सूत्रसंचालन (Anchoring) करण्याची जबाबदारी उत्तर महाराष्ट्रातील नामवंत व सेलिब्रिटी अँकर आणि कलावंत तुषार वाघुळदे (जळगाव) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.ही निवड महाराष्ट्र चित्रपट कलाका असोसिएशनने केली आहे.डायरेक्टर्स व प्रोड्युसर्स यांची ही प्रमुख आणि जबाबदार संघटना आहे.खान्देशातील तुषार वाघुळदे यांची या पदासाठी अधिकृत निवड झाल्याने संगीत आणि कला क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

देशभरातील कराओके गायकांना आणि संगीतप्रेमींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात करण्यात आले आहे.या संमेलनात भारतातील विविध राज्यांमधून शेकडो प्रतिभावान कराओके गायक,गायिका संगीतकार आणि क्षेत्रातील दिग्गज एकत्र येणार आहेत.हे संमेलन ऐतिहासिक होणार आहे.अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची मुख्य धुरा सांभाळण्यासाठी महाराष्ट्रातून एकमेव तुषार वाघुळदे यांची निवड होणे ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.श्री.वाघुळदे हे मराठी फिल्म्स चेंबर्स ऑफ कॉमर्स ,कोल्हापूरचे माजी सचिव असून अ.भा.मराठी चित्रपट महामंडळाचे माजी सदस्य तसेच सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये कार्यरत आहेत,त्याचप्रमाणे ऑर्केस्ट्रा 7 स्ट्रिंग्स या प्रसिद्ध ग्रुपचे संचालक, ऑर्गनायझर आहेत.

कलावंत तुषार वाघुळदे यांनी आपल्या दमदार आवाज व बहारदार शैलीने,उत्कृष्ट संवाद कौशल्याने,समयसूचकता आणि हजरजबाबीपणाने यापूर्वी अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम यशस्वीपणे गाजवले आहेत.एक “उत्कृष्ट निवेदक” म्हणून श्री.वाघुळदे यांचे नवी मुंबई, पनवेल,सिंधुदुर्ग,छत्रपती संभाजी नगर,लातूर,परभणी,अहिल्यानगर,नाशिक,बऱ्हाणपूर,खंडवा,पुणे,पिंप्री चिंचवड, सांगली,कोल्हापूर,नागपूर,अमरावती,चंद्रपूर, भंडारा, अकोला,धुळे,इंदोर,भोपाळ,इटारसी (मध्यप्रदेश) चितोडगड,कोटा (राजस्थान) सहारणपूर, विजयवाडा ( आंध्रप्रदेश) यासह अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रम गाजवले आहेत.संगीत क्षेत्राची उत्तम जाण आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची त्यांची हातोटी लक्षात घेऊनच आयोजकांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना तुषार वाघुळदे म्हणाले, “काश्मीरसारख्या विहंगम व नंदनवन आणि निसर्गरम्य अशा भूमीवर होणाऱ्या ‘पहिल्या ऐतिहासिक राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलनाचे’ सूत्रसंचालन करण्याची संधी मला मिळणे हे माझे भाग्य समजतो.या राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मला अत्यंत आनंद होत असून उर अभिमानाने भरून आला आहे आणि हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देईन.” आणि महाराष्ट्र व खान्देशच्या लौकिकात मोलाची भर घालेन..!
या निवडीबद्दल राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, संगीत क्षेत्रातील कलाकार,त्यांचे मित्रपरिवार,इव्हेंट्स ऑर्गनायझर्स आणि हितचिंतकांनी तुषार वाघुळदे यांचे अभिनंदन करून त्यांना काश्मीरमधील या पुढील प्रवासासाठी आणि संमेलनाच्या यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. संपर्क :- 9405057141💐👍

