मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ स्थितीबद्दल भुसावळ येथे आढावा बैठक संपन्न .
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) दुपारी ४ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती . वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार निता लबडे उपस्थित होते .
या बैठकित .पाणीटंचाई, चारा उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि शेती पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला . संबधित अधिकारी कर्मचारी यांना नगरपालिका ग्रामपंचायत हद्दीत शेती शिवारात भेटी देवुन परिस्थितीचा आढावा घेवुन संबंधित अधिकारी यांच्या संपर्कात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या .
धरण व तलावातील पाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखी ठेवण्यात येणार असून शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करण्याचे सांगण्यात आले .
बैठकीस गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूमी अभिलेख, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, वन, महावितरण, लघु पाटबंधारे तसेच मृद व जलसंधारण , पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते .
यावेळी मंत्री ना . संजय सावकारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्र्यांनी 265 तालुके दुष्काळी घोषित केले असून त्यात भुसावळ तालुक्याचा समावेश आहे . तालुक्यात सध्या हतनूर धरणात पाणी उपलब्ध असले तरी पुढे पाण्याची समस्या वाढू शकते . त्यासाठी हे पाणी पिण्यासाठी राखीव राहील तसेच जनावरां साठी चाऱ्या सुद्धा भुसावळ तालुक्यात सध्या तरी उपलब्ध आहे परंतु पुढे प्रश्न उद्भवल्यास त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील .शेतकऱ्यांच्या मदती बाबत त्यांनी सांगितले की शासकीय नियमानुसार शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे . अजुन घोषणेच्या जी आर निघाला असून पुढील कार्य तत्परतेने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे .

बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. शासनाच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.

