Tuesday, September 29, 2026
Homeजळगावप्रभाग क्र. २ मधील मदिना नगर आणि कृष्णातारा नगर येथे विविध विकासकामांचे...

प्रभाग क्र. २ मधील मदिना नगर आणि कृष्णातारा नगर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न.

प्रभाग क्र. २ मधील मदिना नगर आणि कृष्णातारा नगर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.२९
नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधील मदिना नगर व कृष्णातारा नगर परिसरातील विविध मूलभूत विकासकामांचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छायाताई अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक रहिवाशांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले.या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांचे गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले प्रश्न आणि समस्या मार्गी लागणार आहेत.

ठळक मुद्दे व वैशिष्ट्ये —
स्थानिक रहिवाशांच्या हस्ते श्रीफळ अर्पण : नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळेपण जपत लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या व महिलांच्या हस्ते प्रत्यक्ष भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

दीर्घकालीन समस्यांवर मात —
मदिना नगर व कृष्णातारा नगर भागातील रस्ते, गटारी व इतर पायाभूत सुविधांच्या कामांमुळे नागरिकांची अनेक वर्षांची गैरसोय दूर होणार आहे.
नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त:

 


विकासकामांचा शुभारंभ झाल्याबद्दल परिसरातील स्थानिक महिला व पुरुष रहिवाशांनी आनंद व्यक्त करत नगराध्यक्ष सौ.छायाताई पाटील तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले.

प्रमुख उपस्थिती:
या कार्यक्रमास नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील, गटनेते सागरभाऊ चौधरी, नगरसेवक परागदादा सराफ, नगरसेवक निसार शेख, रुबाब तडवी हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.तसेच हकीम शेठ,कदीर खान, मजहर भाई,करीम मन्यार, उमर कच्ची,निलेश बारी, शरद कोळी,जगदीश शेठ कवडीवाले,कडू पाटील, योगेश पाटील,पप्पू जोशी,सारंग बेहेडे, नईम खान,फारुख हाजी, नरेंद्र शिंदे,जुगल घारू,भूषण खैरे, राज शिर्के,गोलू माळी यांच्यासह मदिना नगर व कृष्णातारा नगर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या