Wednesday, September 30, 2026
Homeजळगावयेथील रोजगार मेळाव्यात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १२९ उमेदवारांची निवडीने आनंदाचे वातावरण .

येथील रोजगार मेळाव्यात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १२९ उमेदवारांची निवडीने आनंदाचे वातावरण .

चोपडा येथील रोजगार मेळाव्यात तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१२९ उमेदवारांची निवडीने आनंदाचे वातावरण .

चोपडा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व डॉ. केतकी पाटील फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित – रोजगार महाकुंभ अंतर्गत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा चोपडा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज 29 सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात, प्रमुख मान्यवर म्हणून नायब तहसीलदार, चोपडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय वाणी, भाजपा जळगाव जिल्हा महामंत्री राकेश दादा पाटील, भाजपा चोपडा शहर मंडल अध्यक्ष नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजपा मंडळाध्यक्ष पिंटू भाऊ पावरा, कांतीलाल जी पाटील, मुरलीभाई गुजराती, भाजपाचे नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते


मुख्यमंत्र्यांचे असते ऑनलाइन उद्घाटन झाल्यानंतर मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश वाणी यांनी मांडताना डॉ. केतकी पाटील फाउंडेशन चे सामाजिक उपक्रम, या रोजगार कुंभमेळ्यात ठिकठिकाणी घेतले जाणारे उपक्रम व चोपडा येथे रोजगार मेळावा घेण्याबद्दल ची सविस्तर माहिती प्रस्तुत केली.

 


अध्यक्षीय भाषणासह मान्यवरांचे मनोगतही यावेळी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिंदे सरांनी केले.
या रोजगार मेळाव्यात
९ उद्योजक सहभागी झाले. तसेच १९९
(स्त्री- ४४ पुरुष- १५५ ) उमेदवारांनी सहभाग घेत मुलाखती दिल्या. यात १२९ जणांची प्राथमिक निवड झाली त्यात (स्त्री- २८ पुरुष-१०१) त्यातील वीज जणांचे अंतिम निवड झाली
(स्त्री- 0५पुरुष-१५)
असा उत्स्फूर्त प्रतिसाद चोपडा येथील प्रथम संपन्न झालेल्या रोजगार मेळाव्यात लाभला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या