सावदा येथील रोजगार मेळाव्यात 36 उमेदवार ठरले रोजगारासाठी पात्र .
सावदा खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ.केतकी पाटील फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व सावदा नगरपालिकेच्या सहकार्याने मंगळवार 29 सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
भारतरत्न डॉ
बाबासाहेब आंबेडकर सभागृह सावदा येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष सुरेखाताई बोंडे यांनी भूषविले . तर उद्घाटक म्हणून सावदा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ रेणुका ताई पाटील या होत्या . यावेळी प्रमुख मान्यवर भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री महेश भाऊ चौधरी ,सावदा मंडळ अध्यक्ष श्री दुर्गादास भाऊ पाटील ,सावदा नगर परिषदेच्या गटनेच्या रंजनाताई भारंबे, नगरसेविका सौ जयश्रीताई नेहाने,सौ प्रतीक्षा ताई भंगाळे,
नगरसेवक श्री सचिन भाऊ बऱ्हाटे, सौ सारिका ताई चव्हाण ,जाबीर बेग ,श्री बाजीराव ठाकरे ,श्री संजय माळी आदी उपस्थित होते .

भारत माता आणि श्री. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
श्री महेश चौधरी यांनी तर सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस श्री महेश अकोले यांनी केले.
या मेळाव्यात ४ आस्थापना सहभागी झाल्या होत्या. तर 75 उमेदवारांनी सहभाग नोंदविला यात 44 पुरुष व 31 महिला होत्या. 48 उमेदवारांचे प्राथमिक निवड झाली यात चाळीस पुरुष व आठ महिला समाविष्ट आहे. त्यातील 36 उमेदवारांची अंतिम निवड झालेली असून त्यात 29 पुरुष व 7 महिला आहेत.
सावदा येथे प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुरुष आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षणीय राहिला.


