Wednesday, September 30, 2026
Homeजळगावडॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या फलकनाज शेखचे वुशू स्पर्धेत सुवर्णयश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या फलकनाज शेखचे वुशू स्पर्धेत सुवर्णयश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या फलकनाज शेखचे वुशू स्पर्धेत सुवर्णयश
राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी

भुसावळ,   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी फलकनाज आसिफ शेख हिने विभागीय आंतरशालेय वुशू स्पर्धा २०२६ अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत फलकनाज हिने आपल्या उत्कृष्ट खेळकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. आत्मविश्वास, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळविले. तिच्या या यशामुळे डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

फलकनाजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. आगामी स्पर्धांमध्येही अशीच दमदार कामगिरी करून आणखी उत्तुंग यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

फलकनाजच्या यशाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही तिचे कौतुक करत अभिनंदन केले. तिच्या सुवर्णपदकामुळे शाळेतील क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने सराव करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या