Wednesday, September 30, 2026
Homeजळगावरामपेठेत सट्टा पेढीवर सशस्त्र दरोडा; ४० ते ५० हजारांची रोकड लंपास ?

रामपेठेत सट्टा पेढीवर सशस्त्र दरोडा; ४० ते ५० हजारांची रोकड लंपास ?

रामपेठेत सट्टा पेढीवर सशस्त्र दरोडा; ४० ते ५० हजारांची रोकड लंपास ?

चाकू व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून रोकड लुटल्याची घटना

वरणगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शहरातील रामपेठ परिसरात एका सट्टा-मटका पेढीवर तीन नकाबपोशांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांची मोठी वर्दळ असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना तीन तरुणांनी अचानक पेढीत प्रवेश केला. यावेळी दोघांच्या पोटावर चाकू रोखण्यात आला, तर अन्य एका व्यक्तीच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखून धमकावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गल्ल्यातील अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांची रोकड बळजबरीने घेऊन संशयित पसार झाल्याची चर्चा आहे.
घटनेनंतर संबंधितांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते. विशेष म्हणजे, या प्रकाराची अधिकृत तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
सट्टा-मटका व्यवसाय बेकायदेशीर असल्याने संबंधितांकडून पोलिसांत तक्रार करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा आहे. याच परिस्थितीचा फायदा गुन्हेगारांकडून घेतला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, शहरात चाकू, रिव्हॉल्वर यांसारख्या शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करण्याचे प्रकार वाढत असल्याची नागरिकांमध्ये चिंता आहे. एखाद्या बेकायदेशीर व्यवसायातील व्यक्तीने तक्रार केली नाही, तरी त्यातून निर्माण होणारी शस्त्रबळाची गुन्हेगारी सामान्य नागरिकांसाठी गंभीर धोका ठरू शकते. यापूर्वी भुसावळ शहरात अश्याच प्रकारची घटना घडली होती .
या घटनेची पोलिसांनी स्वतंत्रपणे चौकशी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि शस्त्रांचा वापर करणाऱ्या संशयितांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या