भुसावळ येथील गजाननभक्त मामा पाचपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान .
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील गजानन महाराजांचे निस्सीम भक्त शेगाव साठी भुसावळातून पहिली पायी दिंडी काढणारे मामा पाचपांडे उर्फ विनायक पाचपांडे यांना नागपूर येथे २७ सप्टेबर रोजी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या नामस्मरणाने, भक्तिभावाच्या स्पंदनांनी आणि अध्यात्मिक ऊर्जेच्या साक्षीने रघुजीनगर येथील संताजी सभागृहात संत गजानन महाराज पारायण सेवा समितीच्या वतीने आयोजित ‘ या महापारायण सोहळ्यात तब्बल १,९७३ भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग असलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे, निखिल मुंडले, भोजराज घोडमोरे, मनीषा यमसनावार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी समितीचे सचिव गजानन देशपांडे यांनी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले .
पारायण समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवन गौरव पुरस्कार’ भुसावळ येथील ज्येष्ठ वारकरी विनायक पाचपांडे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या अखंड भक्तीभाव आणि संत परंपरेतील योगदानाचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सन्मान केला.मामा देशपांडे यांनी पन्नास वर्षापासून भुसावळ शेगाव साठी पायी वारी काढलेली आहे ‘ तसेच त्यांनी आतापर्यंत 30 व्यक्तीच्या देहदानाची नोंदणी केलेली आहे अश्या विविध कार्याची नोंद घेवुन त्यांना हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे .


