Thursday, October 1, 2026
Homeजळगावभुसावळ शहरातील तृतीयपंथीयाची हद्दपारी; वर्षभरासाठी जिल्हाबंदी !

भुसावळ शहरातील तृतीयपंथीयाची हद्दपारी; वर्षभरासाठी जिल्हाबंदी !

भुसावळ शहरातील तृतीयपंथीयाची हद्दपारी; वर्षभरासाठी जिल्हाबंदी !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ शहरातील गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर आकाश अश्विनी उर्फ आशु श्रावण बाविस्कर (वय ३५, रा. व्हीआयपी कॉलनी, भुसावळ) याच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांनी आदेश पारित करून संबंधितास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

अपर पोलिस अधीक्षकांनी ५ मे २०२६ रोजी हद्दपारीचा प्रस्ताव सादर करून संबंधितास दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले.चौकशी अहवालात २०१६ पासून संबंधिताच्या विविध गुन्हेगारी हालचालींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्याच्याविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणात उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांचा प्रस्ताव, चौकशी अहवाल तसेच संबंधिताने सादर केलेला खुलासा आणि केलेला युक्तिवाद विचारात घेतला. उपलब्ध बाबींचा विचार केल्यानंतर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी पुरेशी कारणे असल्याचे नमूद करण्यात आले.

त्यानुसार आकाश अश्विनी उर्फ आशु श्रावण बाविस्कर याला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांनी पारित केले आहेत. या कारवाईमुळे भुसावळ शहरातील गुन्हेगारी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईला अधिक बळ मिळाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या