केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसेंकडे क्रीडांगणाचा प्रस्ताव सादर*
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरात क्रीडांगण नसल्यामुळे खेळाडूंना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . त्यासाठी वरणगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील क्रीडागणासाठी आरक्षित असलेल्यां भिलेश्वर ट्रस्ट व जुन्या गावातील जागेवर नगर परिषदेने आरक्षण टाकलेल्या जागेवर अथवा नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवरील भूखंडावर पवन नगर जवळील १३ एकर अथवा सिदेश्वर नगर जवळील नगर परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर आधुनिक क्रीडांगण मंजूर करावे अश्या मागणीचा सात बारा चा उतारा सहित प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री नामदार श्रीमती रक्षा ताई निखिल खडसे यांना भेटून लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंनी सुपुर्द केला आणि मंत्री रक्षा खडसेंना सर्व प्रस्ताव मध्ये मिमूद केलेल्या जागांचे स्पष्टीकरण करून दिले यावेळी नगरसेवक नाना चौधरी शामराव धनगर शहराध्यक्ष सुनील माळी आकाश निमकर बळीराम दादा सोनवणे क्रीडा समितीचे अजमल भाई खान फझल शेख राहुल देशमुख भोजराज पालवे यावेळी उपस्थित होते .

