भुसावळातील ज्येष्ठ नागरिक वामन सोनू सावळे यांचे दुःखद निधन
९४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सावळे परिवारावर शोककळा !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील जळगाव रोडवरील श्रीनगर येथील रहिवासी वामन सोनू सावळे (वय ९४) यांचे ५ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सावळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वामन सावळे हे अत्यंत सुस्वभावी, प्रेमळ आणि सहकार्याची भावना जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी आप्तेष्टांसह परिसरातील नागरिकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंधित गजानन वामन सावळे आणि नरेंद्र वामन सावळे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.वामन सावळे यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी सावळे कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने परिवाराने एक प्रेमळ, आधार देणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

