Tuesday, October 6, 2026
Homeजळगावमहात्मा गांधी विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न .

महात्मा गांधी विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न .

महात्मा गांधी विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न .
वरणगाव   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जिल्हास्तरीय शालेय शासकीय मल्लखांब स्पर्धा वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील ५२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन वरणगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा तथा वरणगाव नगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेविका वंदना पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक संजय चौधरी, विद्यालयाचे प्राचार्य सी. जे. तायडे, उपमुख्याध्यापक डी. आर. कोळंबे, पर्यवेक्षक पी. एस. झोपे, आशिष चौधरी, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

यावेळी बोलताना वंदना पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो. विद्यार्थ्यांनी मोबाईल व इतर व्यसनांमध्ये वेळ न घालवता मैदानावर अधिक वेळ द्यावा. क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करून तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वरणगावचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महात्मा गांधी विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुलांच्या १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील स्पर्धांमध्ये महात्मा गांधी विद्यालयाच्या नऊ खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथील तीन व लिटल व्हॅली स्कूल, जळगाव येथील एका खेळाडूसह मुलांच्या गटातील एकूण १२ खेळाडूंची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

मुलींच्या गटातील १२ खेळाडूंची निवड
मुलींच्या १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील स्पर्धांमध्ये काशिनाथ प्लॉट स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठान माध्यमिक विद्यालय, शाहूनगर, चावरा इंटरनॅशनल स्कूल, जळगाव, बियाणी पब्लिक स्कूल, भुसावळ तसेच महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या गटातील १२ खेळाडूंचीही नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

 

विजयी खेळाडू तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत हरी बढे, संस्थेच्या अध्यक्षा वंदना पाटील, कार्यकारिणी व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य सी. जे. तायडे, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

स्पर्धेसाठी पंच म्हणून गणेश बोदडे, सचिन चौधरी, वीरेंद्र हळदे, गणेश टिटोरे आणि आशुतोष भोई यांनी जबाबदारी पार पाडली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या