Thursday, October 8, 2026
Homeगुन्हाबाळापूर हद्दीतील खळबळजनक खूनाचा उलगडा - कट मारल्याच्या वादातून झालेल्या हत्येतील दोन...

बाळापूर हद्दीतील खळबळजनक खूनाचा उलगडा – कट मारल्याच्या वादातून झालेल्या हत्येतील दोन फरार आरोपी जेरबंद.

अकोला पोलिसांची मोठी कामगिरी.

बाळापूर हद्दीतील खळबळजनक खूनाचा उलगडा – कट मारल्याच्या वादातून झालेल्या हत्येतील दोन फरार आरोपी जेरबंद.

अकोला,    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी         दि.०७ ऑक्टोबर २०२६ – बाळापूर हद्दीत घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे.अनोळखी आरोपी,सीसीटीव्ही फुटेज नाही आणि फिर्यादी-आरोपीमध्ये कोणतीही पूर्वओळख नाही, अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अकोला पोलिसांनी या गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल केली आहे.

ठळक मुद्दे : • गुन्हा काय? गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून चाकूने प्राणघातक हल्ला,एकाचा मृत्यू.

कधी घडला ? २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास.
ठिकाण: पारस फाटा, उड्डाणपुलाजवळ, बाळापूर हद्द, जि. अकोला.
आरोपी कोण ? १) वैभव पुरुषोत्तम शितळे (वय २२),रा. जिल्हा परिषद कॉलनी,खडकी, अकोला २) गौरव गजानन घुगे (वय २६), रा. म्हाडा कॉलनी, खडकी, अकोला.कलम सुरुवातीला खुनाचा प्रयत्न, मोईन गवळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कलम १०३(१) भारतीय न्याय संहिता (जुने ३०२ भा.दं.वि.) ची वाढ.
घटनेचा थरार :
फिर्यादी आणि त्यांचे मित्र मोईन गवळी हे अमरावती येथून सामानाची खरेदी करून अर्टिगा कार (MH 12 TV 0652) ने बाळापूरकडे परतत होते. दरम्यान रस्त्यावरून झालेल्या वादातून,पल्सर मोटरसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गाडीला कट मारून समोर अडवले.शिवीगाळ करत जवळच असलेल्या चाकूने दोघांवर प्राणघातक हल्ला करून आरोपी पसार झाले.
गंभीर जखमी मोईन गवळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तपासासमोर मोठी आव्हाने :
या गुन्ह्यात फिर्यादी व आरोपी यांची पूर्वीची कोणतीही ओळख नव्हती.
आरोपींचे नाव, मोबाईल नंबर, दुचाकीचा नंबर काहीही उपलब्ध नव्हते.घटनास्थळाच्या आसपास एकही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग ६ ते ७ दिवस बाळापूर ते अकोला व खामगावकडे जाणारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, पण आरोपी स्पष्टपणे दिसून आले नाहीत.
खबऱ्यांच्या जाळ्यातून उलगडा :
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सीसीटीव्ही फुटेजमधून यश मिळत नसताना,स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले.तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा वैभव शितळे याने साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गाडीचा कट लागल्यामुळे झालेल्या वादातून हा खून केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी बाळापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

या कामगिरीत सहभागी अधिकारी व अंमलदार :
ही कारवाई मा. SP अर्चित चांडक, मा. Addl. SP बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन लेव्हरकर, तसेच अधिकारी निलेश देशमुख, गोपाळ जाधव, विष्णू बोडखे,माजीद पठाण, अनिल व्हाण व पोलीस अंमलदार शेख हसन,उमेश पराये,सुलतान पठाण,फिरोज खान,भास्कर थोर्रे,अमित दुबे, अब्दुल माजिद,रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये,किशोर सोनोने, खुशाल नेमाडे,मंगेश इंगळे, वसीमोद्दीन,एजाज अहमद, राहुल गायकवाड,स्वप्नील खेडकर,श्रीकांत पार्तोड, अनसर अहमद, राज चंदेल,आकाश मानकर,धिरज वानखडे,पवन डांबलकर,अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर,सतिश पवार, अशोक सोनवणे,भिमराव दिपके, चालक विनोद ठाकरे,प्रविण कश्यप, रामकिसन डोईफोडे, मनिष ठाकरे,देवानंद खरात, प्रकाश लोखंडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या