भुसावळ शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व आगामी सन उत्सवाचे पार्शभूमी वर प्रभावी ‘मॉब डिस्पर्सल मॉक ड्रिल’ संपन्न
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाटकर चौक, गवळीवाडा येथे आज सकाळी ११:०० ते १२:४५ या वेळेत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व नवरात्र उत्सवाचे अनुषंगाने ‘मॉब डिस्पर्सल मॉक ड्रिल’ (गर्दी नियंत्रण प्रात्यक्षिक) यशस्वीपणे पार पडले.


या मॉक ड्रिलमध्ये भुसावळ शहर, बाजारपेठ, तालुका आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांचे १० अधिकारी, ४० अंमलदार व १ आरसीपी पथक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. सर्व संबंधित पथके वेळेत घटनास्थळी हजर झाली. या दरम्यान नियंत्रण कक्षाला तात्काळ संदेश देऊन प्रत्येक हालचालीची व घटनास्थळी पोहोचण्याच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यात आली.
या ड्रिलची उल्लेखनीय वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे होती:
यात १ दंगल नियंत्रण पथक , कार्यकारी दंडाधिकारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल यांच्या समन्वयाने प्रात्यक्षिक राबविण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांचा प्रतिसाद आणि घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ अचूकपणे मोजण्यात आला.
गर्दी नियंत्रणाचे हे प्रात्यक्षिक कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांची आपत्कालीन तयारी तपासण्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले.

