रावेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ ;
१२० हून अधिक पदांसाठी थेट मुलाखती; कंपन्यांकडून निवड
रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रावेर, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ रावेर येथील विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात झाला.या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांनी १२० हून अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेत उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविली.
या कार्यक्रमाचे ऑनलाईन आभासी उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथून करण्यात आले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जळगाव आणि विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.हा उपक्रमासाठी स्वातंत्र्यवीर गोविंदरावजी वैद्य शासकीय आयटीआय यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमंत नाईक होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा संगीता महाजन उपस्थित होत्या . यावेळी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगावचे आयुक्त संदीप गायकवाड यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

—
थेट कंपन्यांशी संवाद, मुलाखती आणि निवडीची संधी
रोजगार मेळाव्यात द ग्रीन जेनेसिस, क्रिस क्रॉप, डेक्कन सेल्स, त्रिमूर्ती इंजिनिअर, एनसीसी कंपनी, जोगेश्वरी अॅग्रो, एलआयसी इंडिया आणि बंधन बैंक आदी कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्यांनी रोजगार इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. त्यामुळे रावेरसह ग्रामीण भागातील युवकांना रोजगारासाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याऐवजी आपल्या परिसरातच विविध कंपन्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधून रोजगाराच्या संधी मिळविण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले. कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये रोहिणी बढे, अतुल गणेकर, गोपाल पाटील, श्रीराम चौधरी, रवींद्र बारी, प्रशांत पाटील, नितीन चौधरी, सिद्धांत पाटील आणि रामेश्वर माळकर यांचा सहभाग होता.
——–
युवक-युवतींनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
रोजगाराच्या अपेक्षेने तालुक्यातील युवक-युवती मोठ्या संख्येने महाविद्यालयाच्या परिसरात दाखल झाले होते. विविध पदांसाठी थेट मुलाखती देण्याची संधी मिळाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह होता. ग्रामीण युवकांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेण्यासाठी रोजगार महाकुंभ महत्त्वाचा ठरला. कार्यक्रमास नगरसेविका प्रमिला पाटील,अर्चना पाटील, योगिता महाजन, तसेच डॉ. प्रतीक नाईक, युवराज बिरपन, नोडल अधिकारी डॉ. सी.पी. गाढे, जसपालसिंग गिरासे, शासकीय आयटीआयचे प्रभारी प्राचार्य एम.पी. पवार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संदीप धापसे, उपप्राचार्य प्रा.एस.यु.पाटील, डॉ. बी. जी. मुख्यदल, डॉ. एस.बी. धनले, व्ही. आय. पाटील आणि एस. एम. भालेराव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ. मनोहर तायडे, प्रा. योगेश मावळे, प्रा. तेजस दसनूरकर, प्रा. व्ही.डी. जोशी, प्रा. सागर महाजन, प्रा. एल. एम. वळवी, प्रा. मनीष महाजन, जयेश बढे, रितिक गाढे, प्रसाद महाजन आणि मेहरबान तडवी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.सी.पी. गाढे यांनी केले. प्रास्ताविक जसपालसिंग गिरासे यांनी तर आभार प्रदर्शन संजय भालेराव यांनी केले.
—

