भुसावळ : सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थिनींना शरबत व थंड पेयजल वाटप
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी , दि. १५ ऑक्टोबर २०२६ (गुरुवार) – सेवा संकल्प अभियानांतर्गत गंगाराम प्लॉट, माहूरकर टेंट हाऊस परिसरातील रहिवासी व आस्थापना संचालक यांच्या लोकसहभागातून शारदोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शालेय विद्यार्थिनींना गुलाब शरबत व थंड पेयजलाचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला .

शहरातील गंगाराम प्लॉट भागात अहिल्यादेवी कन्या विद्यालय आयोजित शारदोत्सव विसर्जन मिरवणुकीत दैवी रूपी बलिकांची तहान भागविण्याचा हा उपक्रम होता .
याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सीमाताई नरवाडे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा अनिता आंबेकर, सचिव वंदना सोनार, बेबीताई पाटील, कल्पना पाटील, सीमा खरोटे, रेणुका लोखंडे, रेखा रत्नपारखी, अर्चना राठोड, निर्मला पाटील, स्नेहल राठोड, सरिता वाणी, अर्चना माहुरकर, प्रभावती कासार आदी महिला उपस्थित होत्या.

तसेच भाजपा शहराध्यक्ष (दक्षिण) किरण कोलते, *सरचिटणीस पवन बुंदेले, जयंत माहुरकर, अमोल महाजन* शिक्षक आघाडी जळगाव जिल्हा पूर्व सरचिटणीस भास्कर पाटील, राकेश राठोड, बिरजू शेठ आहुजा, दगडू सुरती, अजय गोग्या, दीपक गोग्या, गजानन पाटील, कुमार पाटील, संघदीप नरवाडे, नंदकिशोर पाटील, किशोर बाकसे, उमेश माहुरकर, प्रवीण भंगाळे,गोलू बठेजा, दीपक आठवाणी, किरण चौधरी, मयूर चौधरी, श्याम माहुरकर, गोपी सिंग राजपूत यांसह अनेक मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपक्रमाचे भुसावळ शहर व परिसरात कौतुक होत आहे.

