जामनेर तालुक्यात भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू. तीन लहान मुलांचा समावेश.
जामनेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात म* दाभाडी ते वाडी किल्ल्यादरम्यान गुरुवारी सुमारे चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तीन लहान मुले आणि तीन प्रौढ व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या हृदय द्रावक घटनेमुळे संपूर्ण जामनेर तालुक्यावर शोकाकळा पसरली आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे कार्यकर्ते तथा रुग्णवाहिकेचे चालक जालमसिंग यांनी घटनास्थळी धाव घेतली मदत कार्य सुरू केले. अपघातातील मृतांना जामनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. या भीषण दुर्घटनेची माहिती समजतात जामनेर ग्रामीण रुग्णालय बाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली असता त्या ठिकाणी नगराध्यक्ष सौ साधनाताई सुद्धा जातीने हजर झाल्यात. या वृत्ताने जामनेर परिसरात व शहरात हळहळ व्यक्त होत आहे हा अपघात मन हेलवून टाकणारा असून मृतांची ओळख व अपघाताची नेमकी कारणे याबाबत अधिकृत माहिती मिळवण्याचे काम जामनेर पोलीस स्टेशन करीत आहे.

