Friday, October 16, 2026
Homeजळगावयावल शहरात दसऱ्यानिमित्त भव्य रावण दहन सोहळा.

यावल शहरात दसऱ्यानिमित्त भव्य रावण दहन सोहळा.

यावल शहरात दसऱ्यानिमित्त भव्य रावण दहन सोहळा.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.१६
श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल आयोजित सालाबादाप्रमाणे यंदाही विजया दशमी (दसरा) निमित्त भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दि. २० ऑक्टोबर २०२६, मंगळवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिराजवळ होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमोलदादा हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नंदकिशोर महाजन (विधान परिषद सदस्य) उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षा
सौ.छायाताई पाटील,जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनंजय चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका सौ. केतकीताई पाटील,यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे अरुण पवार (प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग), माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे उपस्थित राहतील.
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर,यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे,चेअरमन शेतकी संघ नारायण बापू चौधरी, जि.प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, अभियंता जहांगिर तडवी, उद्योजक अभय शेठ देवरे, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, दिपक शेठ वेहेडे,चंद्रकांतदादा देशमुख, चंद्रकांतदादा चौधरी,भगतसिंग पाटील,उज्जैनसिंग राजपूत, आर.डी.पाटील,आकाश चोपडे, हाजी मुस्तुफाखाँ शेठ,शशिकांत अनंत देशपांडे,डॉ.शंतनु देशपांडे, नगरसेवक सागर चौधरी,विपुल चौधरी,अभिमन्यू चौधरी (हेद्री शेठ), हेमराज (बाळू) फेगडे, एम.बी.तडवी,शरद कोळी, मकसुद शेख,रुबाब तडवी, अतुल भालेराव,हकिम शेठ,पी. एस.सोनवणे सर,जयवंतराव येवले,विलास भास्कर,बोदडे नाना, डॉ.युवराज चौधरी,उमेश फेगडे,मुन्ना पाटील, पुंडलिक बारी,अशोक जंगले,कमलाकर घारू,सुनील शेठ नेवे,स्वप्नील देवरे,नितीन महाजन,पराग सराफ,दिलीप वाणी,जगदीश कवडीवाले,शिवा शेठ ( खेतेश्वर स्वीट मार्ट ),योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल तर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या