Friday, November 22, 2024
Homeभुसावळभुसावळात शिवमुद्रा प्रतिष्ठानने सारंगपूर येथील बजरंगबलीची प्रतिकृती साकारुन दर्शन घडवले 

भुसावळात शिवमुद्रा प्रतिष्ठानने सारंगपूर येथील बजरंगबलीची प्रतिकृती साकारुन दर्शन घडवले 

हिंदू समाजातील १७ पगड जातीच्या जोडप्यांच्या हस्ते पुजा

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील शिवमुद्रा प्रतिष्ठान दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून वेगवेगळ्या प्रकारची आरास साकारत असतात. यावर्षी भव्य मंडप उभारुन सांरगपुर येथील बजरंगबलीची प्रतिकृती साकारली आहे.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी भुसावळ शहरातून सकल हिंदू समाजातील १७ पगड जातीच्या जोडप्यांच्या हस्ते पुजा करून स्थापना करण्यात आली आहे. प्रथम पूजेचा मान कुटुंब नायक ललीत पाटील व चेतना पाटील यांना देण्यात आला होता .शिवमुद्रा मंडळ अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व कार्यक्रम राबवत असतात गणेशोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या नविन धार्मिक उपक्रमाची सजावट करून भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देतात हजारोच्या संख्येने भुसावळातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात . भाविकांना दरवर्षी या मंडळांच्या आरास बद्दल उत्कंठा लागलेली असते .

भुसावळ शहरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवमुद्रा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष वरुण इंगळे यांनी भाविकांना केले आहे.गणेशोत्सव यशस्वीतेसाठी शिवमुद्रा मंडळाचे ललित पाटील कुटुंबनायक भोरगाव लेवा पंचायत पडळसा संजय सावकारे आमदार भुसावळ विधानसभा संतोष त्रंबक चौधरी कैलास महाजन डॉ वसंत झारखंडे, सुरेश ठाकूर, बबन चौधरी, रवी ढगे, संतोष शेलोडे, गिरीश बडगुजर, गोटू लाहोटी, गुड्डू अग्रवाल, गब्बर चावरिया,आशिष जाधवाणी,सोनु मांडे, जालूराम कुंभार, निखिल धनगर, दीपक पालकर, सोमनाथ चौरसिया आदी परिश्रम घेत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या