Thursday, October 22, 2026
Homeजळगावसाकळी येथील जय मातादी दुर्गोत्सव मंडळ व ग्रा.पं.सदस्य मुकेश बोरसे यांच्यातर्फे रावेरच्या...

साकळी येथील जय मातादी दुर्गोत्सव मंडळ व ग्रा.पं.सदस्य मुकेश बोरसे यांच्यातर्फे रावेरच्या रणरागिणी आखाड्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक!

साकळी येथील जय मातादी दुर्गोत्सव मंडळ व ग्रा.पं.सदस्य मुकेश बोरसे यांच्यातर्फे रावेरच्या रणरागिणी आखाड्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक!

शिवकालीन युद्धकलेचा थरार
महिलांची लक्षणिय उपस्थिती
यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जय मातादि दुर्गोत्सव मित्र मंडळ चौधरी वाडा,साकळी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य मुकेशभाऊ बोरसे यांच्या संयुक्त विद्यमाने भवानी माता मंदिर मंगल कार्यालय परिसरात शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दि.१५ रोजी शिवकालीन मर्दानी खेळांचा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. रणरागिणी मर्दानी आखाडा, रावेर यांच्या वतीने सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितां ची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा वारसा पुढे नेणाऱ्या या आखाड्यातील चिमुकल्या आणि तरुण मुलींच्या साहसाने संपूर्ण परिसर स्फूर्तिमय झाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन,शस्त्रपूजन करून झाली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकळीचे लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून माळी समाज अध्यक्ष सुभाषनाना महाजन,जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती रविंद्र (छोटू) पाटील,शारदा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक शामकांत महाजन,वढोद्याचे सरपंच संदीपभैय्या सोनवणे,यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे माजी व्हॉ.चेअरमन तेजस पाटील, रावेरच्या रणरागिणी आखाड्याचे जिवन महाजन, साकळी नूतन विकासोचे माजी चेअरमन सुनील नेवे,सूर्यभान बडगुजर,माजी ग्रा.पं.सदस्य साहेबराव बडगुजर,ग्रा.पं.सदस्य परमानंद बडगुजर,भवानी माता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक चौधरी यांचेसह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आखाड्यातील रणरागिणींनी मैदानावर प्रवेश केला. जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने भवानी माता मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
रावेरच्या रणरागिणींनी शिवकालीन युद्धकलेचे एकापेक्षा एक सरस प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये लाठीकाठी आणि फिरती लाठी अत्यंत वेगाने फिरवलेल्या लाठीच्या कौशल्याने प्रेक्षकांना थक्क केले. तसेचे
दांडपट्टा आणि दोन्ही हातात तलवार घेऊन केलेल्या चित्तथरारक हालचाली आणि दांडपट्ट्याची थरारक प्रात्यक्षिके ही या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. तसेच काही रणरागिणींनी आगीच्या ज्वालांसोबत अत्यंत सुरक्षितपणे आणि साहसी पद्धतीने खेळ सादर करून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला.आजच्या काळात महिलांच्या स्वसंरक्षणाची गरज लक्षात घेता, दुर्गोत्सवाच्या पावनपर्वावर आयोजित या पारंपरिक मैदानी खेळांचे महत्त्व किती मोठे आहे. हे या कार्यक्रमातून दिसून आले. रावेरच्या या लेकींनी केवळ खेळ सादर केला नाही,तर स्त्री शक्तीचे एक जिवंत रूपच साकळीकरांसमोर उभे केले. या साहसी खेळांचे कौतुक करत साकळी परिसरातील हजारो ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व रणरागिणींचे स्वागत व कौतुक केले.
जय मातादि दुर्गोत्सव मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रा.पं.सदस्य मुकेशभाऊ बोरसे यांच्या मित्रपरिवाराने कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्टरित्या केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी गाव परिसरातील महिला- पुरुष,युवा वर्गाची मोठी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुनिल महाजन यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या