असत्यावर मात केल्यास सत्याचा विजय होतो
आमदार -नंदकिशोर महाजन
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील तरुणांनी व्यसनाधीनते पासून दूर राहून देशाचे भविष्य व ।आपली संस्कृती टिकवण्यासाठी देव आणि धर्मटिकवावाअखंड भारतामध्ये परकीय शक्ती तरुणांना हाताशी धरून विद्रोह माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत याच्यावर जर आपल्याला विजय मिळवायची असेल सर्वांनी एक संघ राहण्याची गरज आहे अशा चांगल्या उत्सवातून बोध घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा आणि असत्यावर मात करून सत्याचा विजय कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे यावल येथे आयोजित श्री महर्षी व्यास मंदिराच्या परिसरात रावण दहन कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळआयोजित कार्यक्रमात विधानपरिषदेचेनवनिर्वाचित आमदार श्री नंदू भाऊ महाजन यांनी यावेळी आवाहन केले .
छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांची रावण दहनाची वर्षानुवर्षीची परंपरा चालू आहे त्याचे त्यांनी मनापासून कौतुक करून भारतीय संस्कृती खूप महान संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये अनेक सण व उत्सव आपण साजरे करतो त्यामागे खूप मोठा हेतू असतो प्रत्येक उत्सव आपल्याला एक जीवनाशी वेगळी दिशा देणारा उत्सव असतो विजयादशमी हा उत्सव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा सण असून साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दसरा मानला जातो खरंतर रावण हा शिवभक्त होता त्याला रामाचे हातून मरण हवे होते त्यामुळेच खरं रामायण घडले मात्र तो अहंकारी होता अहंकारामुळेच त्याचा सर्वनाश झाला असे आमदार नंदू महाजन यांनीआपल्या . करीत आहे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे शेवटच्या माणसाची सेवा झाली पाहिजे हा विचार अंगीकारून काम करणार केंद्रातील राज्याची सरकार आहे ताई तुम्ही चिंता करू नका तुमच्या काही अडचणी असतील तर त्या नक्की प्राधान्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आमदार नंदकुमार महाजन यांनी दिली
नगराध्यक्ष सौ छायाताई अतुल पाटील यांनीअहंकार रुपी रावणाचा रामाने गर्वहरण केले काही वाईट प्रवृत्तीच्या विचारामुळे त्याचा विनाश झाला .त्याचप्रमाणे शहरातही अनेक रावण आहेत त्यांनी आपली अहंकार सोडून सर्वांचे हित कसे लक्षात घेता येईल याकडे पाहिलं पाहिजे शहरात सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही यासाठी 56 कोटी योजनेची 50% काम शेळगाव बॅरेज वरून पूर्ण झालेले आहे त्यासाठी शासनाकडून 10 कोटी रुपये मिळणार होते दोन दिवस आधी आम्ही यादीमध्येठेकेदाराचे नावआम्ही प्रत्यक्ष पाहिले होते व ठेकेदारालाकाम केल्याचा मोबाईल या कामावरील अनुदान मिळणार होते . त्यात यावलचेही नाव पाहिले जिल्ह्यातील इतर नगरपालिकांचे पैसे मिळाले मात्र याव ल चे नाव ऐनवेळी कट करण्यात आले यात पाण्यात राजकारण करणाऱ्या पडद्याआडील लोकांनी राजकारण करू नये व शहराच्या विकासासाठी आडमुठे धोरण स्वीकारू नये दसऱ्याच्या दिवशी असे आड मुठे धोरण सर्वांनी रावण सोबत सोडून द्यावे असा जळजळीत टोला लगावला .
याआधी डॉक्टर कुंदन फेगडे यांनीछत्रपती शिवाजी मंडळ यांनी रावण दहनाचा कार्यक्रम गेल्या 26 वर्षापासून त्यात दोन वर्ष कोरोनाची वगळतासुरू ठेवलेला आहे व अशा कार्यक्रमांची शहरात गरज असते असे सांगूनया कार्यक्रमाचे आयोजक छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांचे कौतुक केले व उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली
केवळ अहंकार दुराचार आणि वाईट प्रवृत्ती यांच्या विचारामुळे रावणाचा अंत झाला त्याच्या भावानेच असत्याची साथ सोडली व सत्यतेसाठी विभीषण रामासोबत धावून गेला त्यामुळेच रावणाच्या पराभव झाला .त्यामुळेअसत्याची साथ देणाऱ्यांना जनता ही माफ करत नाही असा मार्मिक टोला लगावूनमाजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकअतुल पाटील त्यांनी शहरवासीयांना संबोधित केले . याप्रसंगी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी सूत्रसंचालन करणारे साने गुरुजी हायस्कूलचे शिक्षक विजय ननवरे सर यांनी सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे शहरवासीयांनी पिण्याचे पाणी जे नासाडी करू नये प्रत्येकाने आपल्या नळाला तोट्या लावाव्यात असे आवाहन करीत त्यांच्या आजच्या दिवशी वाढदिवस असल्याने आमदार नंदकुमार महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी स्टेजवरजि प चे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे माजी नगराध्यक्ष दीपक बेहडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंह राजपूत शिवसेनेचे नगरसेवक सागर चौधरी भाजपा गटनेत्या नंदाताई महाजन नगरसेवक हेमराज उर्फबाळू भाऊ फेगडे योगेश चौधरी कदीर खान रुबाब तडवी काँग्रेसचे शहराध्यक्ष अकिल शेठ बोदळे नाना शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले स्वप्निल कोळंबे विजय सराफ यांच्यासह आदी उपस्थित होते .मान्यवरांचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले सर व त्यांच्या संपूर्ण टीम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी रावणाच्या पुतळ्याचे दहन आमदार नंदू महाजन व नगराध्यक्ष सौ छायाताई अतुल पाटील यांच्या हस्तेहजारो नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले तर अमोल भिरुड यांनीआभार मानले .

