Thursday, October 22, 2026
Homeगुन्हासंभाजीनगर, नागपूर डीलर मालकावर वकीलाने चाळीसगाव पोलिसांत केला गुन्हा दाखल

संभाजीनगर, नागपूर डीलर मालकावर वकीलाने चाळीसगाव पोलिसांत केला गुन्हा दाखल

संभाजीनगर, नागपूर डीलर मालकावर वकीलाने चाळीसगाव पोलिसांत केला गुन्हा दाखल

चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  – ठरलेली कार न देता दुसरे मॉडेल दिल्याचा आरोप उन्नती व्हेईकल्सच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल बुकिंग, कोटेशन व बिलातील कथित तफावतीवरून ऍडव्होकेट आरिफ सय्यद यांची चाळीसगाव पोलिसांत फिर्याद नवीन कार खरेदीच्या व्यवहारात ठरलेले मॉडेल न देता दुसऱ्या मॉडेलची कार दिल्याचा, तसेच बुकिंग फॉर्म, कोटेशन, परचेस लेटर आणि बिलाच्या माध्यमातून दिशाभूल करून २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत चाळीसगाव येथील ऍडव्होकेट . आरिफ रफिक सय्यद यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उन्नती व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ऍडव्होकेट सय्यद यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील सेव्हन हिल ब्रिजजवळील उन्नती व्हेईकल्सच्या शोरूममधून रेनॉल्ट कंपनीची ‘कायगर आरएक्सएल’ (Kiger RXL) ही कार खरेदी करण्यासाठी संपर्क साधला होता. या कारचे सवलतीसह ऑन-रोड सात लाख रुपयांचे कोटेशन देण्यात आले होते. त्यासाठी पाच हजार रुपये ऑनलाइन भरून बुकिंग करण्यात आले होते.यावेळी त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली जुनी मारुती सेलेरिओ (क्रमांक MH-19-CU-8116) ही कार देवाणघेवाणीत देण्याचे ठरले. या जुन्या कारची किंमत दोन लाख ७० हजार रुपये निश्चित करण्यात आल्याचे तसेच व्यवहारात २५ हजार रुपयांची सवलत देण्याचे परचेस लेटरमध्ये नमूद करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ठरलेल्या मॉडेलऐवजी दुसरी कार दिल्याचा आरोप
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी नवीन कारसाठी वेळोवेळी शोरूमला एकूण चार लाख रुपये अदा केले. याशिवाय रेनॉल्ट फायनान्सच्या माध्यमातून दोन लाख पाच हजार रुपयांचे वित्तपुरवठ्याचे कागदपत्र असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. मात्र, बुकिंग आणि कोटेशननुसार ‘कायगर आरएक्सएल’ मॉडेलची कार देण्याऐवजी ३ डिसेंबर २०२५ रोजी ‘कायगर टेक्नो एमटी २०२५’ या दुसऱ्या मॉडेलच्या कारची डिलिव्हरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच व्यवहारादरम्यान विविध तारखांना वेगवेगळ्या मॉडेलच्या नावाने पावत्या देण्यात आल्या. प्रत्यक्ष व्यवहार आणि कागदपत्रांमध्ये तफावत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शोरूम व्यवस्थापनाकडे तक्रार करण्यात आली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सवलतीच्या नावाखाली २५ हजार रुपये परस्पर कपात केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
तीन जणांविरुद्ध फिर्याद
या प्रकरणी उन्नती व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हेमांग अजितभाई पारेख, हितेश धिरजलाल पारेख आणि व्यवस्थापक योगेश गांधी यांच्याविरुद्ध अॅड. आरिफ सय्यद यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बनावट व दिशाभूल करणारे दस्तऐवज देऊन आपली फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि वाहन खरेदी-विक्री व्यवहारातील नेमकी वस्तुस्थिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या