पत्रकार एकता फाउंडेशन संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी जोहेब सैय्यद
राष्ट्रीय अध्यक्ष तोषेष शुक्ला यांच्याकडून नियुक्ती; पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल
भुसावळ / खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी कार्यरत असलेल्या पत्रकार एकता फाउंडेशन या राष्ट्रीय संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील पत्रकार जोहेब रमजान सैय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तोषेष लक्ष्मीपती शुक्ला यांनी ही नियुक्ती केली.
पत्रकार एकता फाउंडेशन या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या, हक्क आणि न्यायासाठी कार्य करण्याची जबाबदारी जोहेब सैय्यद यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नियुक्तीपत्रात त्यांच्या जनसेवेतील कार्याचा उल्लेख करत पत्रकारितेसह सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जोहेब रमजान सैय्यद हे भुसावळ येथील रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल जोहेब सैय्यद यांचे पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

