भुसावळ येथे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वारकरी वेशात रॅली
भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे सकल लेवा समाज मंडळातर्फे वारकरी वेषात भव्य रॅली काढण्यात आली .
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील जामनेर रोडवरील अष्टभुजा माता मंदिरापासून सदर आलेला सुरुवात करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण तसेच स्वामीनारायण पंथाचे विविध महाराज मंडळी उपस्थित होते .
दिंडीच्या सर्वात पुढे पारंपारिक बैलगाडी सुद्धा होती तसेच वल्लभभाई पटेल यांची वेशभूषा केलेले व्यक्ती मुख्य आकर्षण होते . तसेच भगवे ध्वज व टाळकरी वारकरी होते . महिलांनी तुळशी वृंदावन घेऊन ज्ञानोबा तुकाराम च्या गजरात ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून भुसावळ येथील सातारे भागात असलेल्या सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली .
या ठिकाणी मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले होते . या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे , प्रतिष्ठा महिला मंडळाचे अध्यक्ष रजनी सावकारे , भाजपाच्या महिला आघाडीच्या केतकी पाटील , शहरातील नगरसेवक , नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीमध्ये लहान बालक महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होती ,सदर रॅलीवर पिंटू भाऊ कोठारी व विविध संघटना तर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली होती . अभूतपूर्व रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .


