Saturday, October 31, 2026
Homeजळगावभुसावळातील रामानंद नगरात १ नोव्हेंबरला श्री करणी मातेचा महाभंडारा; जय कपिलेश्वर नवदुर्गा...

भुसावळातील रामानंद नगरात १ नोव्हेंबरला श्री करणी मातेचा महाभंडारा; जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळाचे आयोजन

भुसावळातील रामानंद नगरात १ नोव्हेंबरला श्री करणी मातेचा महाभंडारा; जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळाचे आयोजन
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       येथील
श्री जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळ, रामानंद नगर यांच्या वतीने परिसरातील भाविक भक्तांसाठी श्री करणी मातेच्या महाभंडाऱ्याचे (महाप्रसाद) भव्य आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व आनंदाच्या सोहळ्यात पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या भव्य आयोजनात सर्व धर्मीय लोकांचा सहभाग असतो अध्यात्मिक स्वरूपात या मंडळाचे कार्य सुरू असून भाविकांची या मंडळावर अधिक श्रद्धा असल्याचे बोलले जाते
कार्यक्रमाची सविस्तर माहिती:
दिनांक: रविवार, १ नोव्हेंबर २०२६
वेळ: सायंकाळी ठीक ६:०० वाजता
स्थान: जय कपिलेश्वर महादेव मंदिर (हॉटेल लोखंडेवाडा समोर), रामानंद नगर, भुसावळ.
श्री करणी मातेच्या या पावन महोत्सवाचा लाभ परिसरातील सर्वधर्मियांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, अशी विनंती जय कपिलेश्वर नवदुर्गा मंडळाच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
प्रमुख आयोजक व कार्यकर्ते:
अध्यक्ष: श्री. दामोदर राजपूत उपाध्यक्ष: श्री. राकेश तळेले खजिनदार: श्री. पवन तेली
कार्याकारणी व मंडळ सदस्य:
श्री. गोपाळ चौधरी, श्री. अतुल वायकोळे, श्री. भालचंद्र कनोजिया, श्री संदीप राणा,श्री. भरत पाटील, श्री. मुरली लोखंडे, श्री. संजय निळे, श्री. दीपक पाटील, श्री. अक्षय कचवे, श्री दयानंद पाटील, श्री वीरेंद राजपूत श्री. गणेश पाटील, श्री. हितेश भोळे, श्री. श्रीराम बनसोडे, श्री.प्रवीण वळस्कर, श्री.बबन नावडे, श्री विजय नेहेतें श्री बोरोले काका श्री आनंदा पाटील,श्री. हर्षल सपकाळे, श्री. किशोर भट, श्री. प्रकाश चौधरी, श्री. संजय काठोके, श्री. योगेश चौधरी, श्री. राजू माळी, श्री. उमेश महाजन, श्री. विजय झोपे, श्री. वैभव भारंबे यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या