यावल शहरात संशयातून पतीने केली पत्नीची हत्या.

यावल शहरासह तालुक्यात पोलिसांचा धाक संपला चर्चेचा विषय.
यावल पोलीस स्टेशन समोर मोठा जनसमुदाय.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२
यावल शहरात संध्याकाळी एकाने स्वतःच्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक आणि खळबळ जनक घटना घडल्याने तसेच यावल पोलीस स्टेशन अंतर्गत आणि तालुक्यात विविध घटना घडत असल्याने तसेच यावल पोलीस स्टेशन पासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरात घटना घडल्यानंतर तसेच् पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने जनसमुदाय जमल्याने आणि घटनेची खबर पोलिसांना तात्काळ न समजल्याने यावल तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी स्थानीक काही पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तालुक्यातून केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरात भुसावळ रस्त्यालगत विस्तारित भागात आयेशानगर आहे.या आयेशानगर मध्ये तिरुपतीनगर हा परिसर आहे.या परिसरातील रहिवाशी शेख साबीर शेख आमिन यांच्या घर क्रमांक ५७० मध्ये भाडेकरू म्हणून आरिफ खान गनी खान हे राहतात त्यांचा मोठा मुलगा फरदीन खान अरिफ खान वय २१ याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. व तो आणि त्याची पत्नी मशीराबी फरदीन खान वय २० वर्ष हे दोघे सोमवारी आपल्या घरी होते. कुटुंबातील इतर लोक एका लग्न समारंभात गावातच गेले होते. दरम्यान दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि या वादातून फरदीन खान याने त्याच्या पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबून तिची हत्या केली व तो फरार झाला होता. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. तेव्हा पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरिक्षक मैनोद्दीन सय्यद, हवालदार वासुदेव मराठे, वसीम तडवी, एजाज गवळी, अर्षद गवळी, अलाउद्दीन तडवी हे घटनास्थळी दाखल झाले तसेच सदर गुन्हा केल्यानंतर फरदीन हा पळून जाण्याच्या बेतात असतांना त्याला साकळी या गावापासून पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर घटनास्थळाचा पंचनामा करून रात्री मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे शहरात राजकारणात समाजात आणि शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

