Monday, November 2, 2026
Homeजळगावरोटरी क्लब ताप्ती व्हॅलीतर्फे ५ हजार विद्यार्थ्यांची प्राणीमित्र चित्रकला स्पर्धा

रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीतर्फे ५ हजार विद्यार्थ्यांची प्राणीमित्र चित्रकला स्पर्धा

रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीतर्फे ५ हजार विद्यार्थ्यांची प्राणीमित्र चित्रकला स्पर्धा

*सात शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ६३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळ :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे जागतिक प्राणी दिनानिमित्त भुसावळ परिसरातील सात शाळांमधील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांसाठी ‘प्राणीमित्र’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये प्राणीमात्रांविषयी प्रेम, करुणा आणि संवेदनशीलता निर्माण करणे, निसर्ग व पर्यावरणाबद्दल जाणीव जागृत करणे तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

सर्वच पाचही शाळेतून या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्र काढताना विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने आणि कल्पकतेने सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रातील खारुताईला चक्क मेकअप करून तिचे आकर्षक चित्र साकारले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा वारंवार आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या

 

कलागुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित झाली. स्पर्धेतील ६३ गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन किशोर राठी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल रोटेरियन राजीव शर्मा उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन हरविंदर सिंह थेठी यांच्यासह भुसावळमधील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचे मानद सचिव सुधाकर सनसे यांनी गेल्या चार महिन्यांत क्लबतर्फे राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला. यामध्ये विज्ञान कार्यशाळा, आर्थिक साक्षरता उपक्रम, मोतीबिंदू तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर तसेच ग्रामीण शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, स्वच्छतेसाठी वॉश बेसिन आणि वर्गखोल्यांसाठी पंख्यांची व्यवस्था अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.

क्लबचे अध्यक्ष रोटेरियन विवेक जोशी यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या पुढील वाटचालीचा संकल्प व्यक्त केला. समाजातील विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी अधिकाधिक सदस्यांना सहभागी करून घेणे, नवीन नेतृत्व घडविणे आणि समाजोपयोगी उपक्रमांची व्याप्ती वाढविणे यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन कुणाल गालफाडे, रोटेरियन हेमंत सनसे, रोटेरियन अजय मिसार, रोटेरियन परेश शाह आणि रोटेरियन सुधीर शर्मा रोटेरीयन अनिल सिसोदिया यांनी विशेष परिश्रम घेतले. क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्यामध्ये प्राणीप्रेम, निसर्गसंवर्धन आणि सामाजिक संवेदनशीलतेची बीजे रुजविण्याचा रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचा हा उपक्रम उपस्थित मान्यवर, पालक आणि शिक्षकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळाला व प्राण्यां विषयी प्रेम कुतुहल निर्माण झाले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या