Sunday, November 8, 2026
Homeआंदोलनभुसावळच्या मतदार यादीतील १४ हजार मतदार गायब . शिवसेनेचे अनिल चौधरी यांची...

भुसावळच्या मतदार यादीतील १४ हजार मतदार गायब . शिवसेनेचे अनिल चौधरी यांची प्रांताकडे तक्रार,

भुसावळच्या मतदार यादीतील १४ हजार मतदार गायब . शिवसेनेचे अनिल चौधरी यांची प्रांताकडे तक्रार,

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             भुसावळचे माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे अनिल चौधरी यांनी शहरातील नमुना ७ मध्ये चुकी झाल्याची तक्रार केली आहे. भुसावळच्या मतदार यादीतील १४,५५७ मतदारांच्या नावांवर आक्षेप दाखल झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, अनिल छबिलदास चौधरी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. ते भुसावळमधील प्रांत कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन मतदार यादीत उघड झालेल्या अनियमिततेवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार आणि विनंती सादर केली असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर

 

नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनिल चौधरी यांनी सांगितले कीआयआर प्रक्रियेदरम्यान, भुसावळ शहरातील १४,५५७ मतदारांच्या नावांवर आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ७ चा कथित गैरवापर करून कोरे अर्ज सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. जन्मापासून भुसावळमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या नावांवरही आक्षेप दाखल होत असताना, सामान्य नागरिकांनी आपल्या मतदानाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अनिल चौधरी यांनी मागणी केली की, फॉर्म ७ अंतर्गत दाखल झालेल्या सर्व आक्षेपांची निष्पक्षपणे चौकशी केली जावी. जर कोणी खोटी माहिती, बनावट कागदपत्रे किंवा चुकीच्या तपशिलांच्या आधारे अर्ज सादर केले असतील, तर कायद्यानुसार संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केली जावी. बैठकीदरम्यान, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी आश्वासन दिले की, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वैध कारणांशिवाय मतदार यादीतून वगळले जाणार नाही. अनिल छबिलदास चौधरी यांनी स्पष्ट केले की, ते या संपूर्ण

 

प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतील. ते म्हणाले की, कोणत्याही नागरिकाच्या मतदानाच्या हक्कावर परिणाम होता कामा नये. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून पारदर्शक कारवाई करावी, अन्यथा भुसावळच्या नागरिकांच्या मतदानाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मोठे जनआंदोलन सुरू केले जाईल. नियम सर्वांसाठी समान आहेत ते पाळणे आवश्यक आहे आणि कोणत्याही पात्र मतदाराच्या लोकशाही हक्कांमध्ये ढवळाढवळ सहन केली जाणार नाही. असे अनिल चौधरी यांनी सांगितले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या