उंबरखेड येथे जुगार अड्ड्यावर मेहुणबारे पोलिसांचा छापा १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

कानुबाई मंदिराजवळ मोकळ्या जागेत सुरू होता पत्त्यांचा खेळ पोलिसांच्या कारवाईने खळबळ
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील उंबरखेड येथे पत्त्यांवर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी छापा टाकून १ लाख ३० हजार ७०० रुपये किमतीच्या मोटारसायकली व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ७ नोव्हेंबर २०२६ रोजी आडगाव रोडवरील कानुबाई मंदिराजवळ करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांना उंबरखेड येथे मोकळ्या जागेत पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे व पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली. यावेळी कानुबाई मंदिराजवळ मोकळ्या जागेत सुरू असलेल्या पत्त्यांच्या खेळावर पोलिसांनी छापा टाकला.या कारवाईत एकूण १ लाख ३० हजार ७०० रुपये किमतीच्या मोटारसायकली व रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त मुद्देमाल मेहुणबारे पोलीस स्टेशनला आणण्यात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश जारवाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस हवालदार किशोर पाटील, बाबासाहेब पगारे, पोलीस कर्मचारी भूषण बाविस्कर, विनोद बेलदार, शांताराम पाटील व गणेश जारवाल यांच्या पथकाने केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मिलिंद कुमावत करीत आहेत.

