Saturday, November 28, 2026
Homeजळगावडी. एस. देशमुख विद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

डी. एस. देशमुख विद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

डी. एस. देशमुख विद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

सावदा     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   ता. रावेर

थोरगव्हाण येथील दि एज्युकेशन सोसायटी संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून स्मृतींना अभिवादन केले.

विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी परिपाठातून विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली. आपल्या मनोगतात त्यांनी महात्मा फुले यांचा शिक्षण, सामाजिक संघर्ष आणि स्त्रीशिक्षणासाठी केलेले ऐतिहासिक कार्य यावर प्रकाश टाकला.

महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन त्यांच्यासोबत मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केले. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध त्यांनी निर्भीडपणे आवाज उठविला. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजविला. आपल्या लेखणीतून लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड पुस्तकातून वास्तव मांडले शेतकरी बांधवांना जागे केले , कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ‘सत्यशोधक समाजाचे संस्थापक’ म्हणून त्यांचे कार्य भारतीय सामाजिक सुधारणांच्या इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आजही समाजाला शिक्षण, समता आणि मानवतेचा मार्ग दाखवितो, असे प्रतिपादन कुरकुरे यांनी केले.

याप्रसंगी विद्यालयाचे योगशिक्षक राजेंद्र बाऊस्कर यांनी विद्यार्थ्यांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यातील महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना बौद्धिक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे, योगशिक्षक राजेंद्र बाऊस्कर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर आणि योगशिक्षणाची जोड अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचा व निरोगी जीवनाचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या