नवयुवक गणेश मंडळाचे अभिनव उपक्रमांचा आदर्श कार्य अन्य मंडळानी जपावा – संजय सराफ

फैजपूर. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रामराज्य सेवाभाव संस्थेच्या माध्यमातून फैजपूर शहरातील समाज एकछत्र संघटीत होऊन हिंदू धर्मातील सर्व सण पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावेत या मुख्य उद्देशाने फैजपूर सार्वजनिक उत्सव समिती अंतर्गत एक दुर्वा समर्पणाची या उपक्रमाव्दारे ठेवलेल्या पुरस्कार वितरित कमी रामराज्य चे सर्व पदाधिकारी व समिती सदस्य यांनी काल संध्याकाळी सर्व गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेतली,या प्रसंगी मंडळ पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी रामराज्यच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला,या प्रसंगी महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराजांशी संवाद साधून आशीर्वाद घेतले.
येथील सतपंथी वार्ड मधील नवयुवक गणेश मंडळाने फैजपुर येथे महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या संकल्पनेतून रामराज्य सेवाभावी संस्था च्या ‘एक दुर्वा समर्पणाची ‘या सार्वजनिक शहर उपक्रमास प्रतिसाद देत आपल्या गावाची साफसफाई करणाऱ्या वाल्मिकी समाज, दिव्यांग, चर्मकार, धर्मबंधु यांच्या हस्ते गणपति बाप्पाची आरती करण्यात आली व त्यांनचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम करून सनातन सकल हिंदू समाज सलोखा बंधुभाव आदर्श जपण्याचे अद्वितीय कार्य या उत्सवाच्या माध्यमातून साधण्याचा यशस्वी प्रयत्न नवयुवक गणेश मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जपला आहे तसेच विसर्जन मिरवणूक्र सुद्धा पारंपरिक पद्धतीनुसार फुलांब्री येथील टाळकरी भजन मंडळी च्या गजरात करणार असल्याची माहिती मंडळ अध्यक्ष कृणाल कोल्हे यांनी दिली आहे हा आदर्श अन्य गणेश मंडळानी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रामराज्य सेवाभावी संघ चे संजय सराफ सह सदस्यांनी मंडळास दिलेल्या भेटी निमित्त केले आहे
यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज यांचेशी रामराज्य संघाची संकल्पना बाबी संवाद साधून आशीर्वाद घेतले आहे महाराजांनी रामराज्य संघची ही संकल्पना कार्य अभिनंदनीय व काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे
याप्रसंगी महामांडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज सोबत रामराज्य चे संजय सराफ,अतुल महाजन, राजाभाऊ चौधरी, निलेश चौधरी, मृणालिनी राणे, अनुराधा परदेशी, हेमांगी चौधरी, मंडळाध्यक्ष कृणाल कोल्हे, सार्वजनिक उत्सव समिती सदस्य गायत्री भंगाळे, उल्हास वाघूळदे, कांतीलाल चौधरी,प्रशांत इंगळे, आदी उपस्थित होते

