Friday, November 22, 2024
Homeजळगावतरुणीसोबत फिरत असल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण !

तरुणीसोबत फिरत असल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण !

 तरुणीसोबत फिरत असल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – व्हीआयपी केटरर्सची ऑर्डर घेण्यासाठी नाशिक येथून आलेल्या एक तरुणीला दुचाकीवरुन घेवून जात असताना गैरसमज होऊन मोहीत राजेश चव्हाण (२७, रा. सम्राट कॉलनी) या तरुणाला १० ते १५ जणांच्या टोळक्याने मारहाण केली. त्याच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेरा चौकात घडली. तरुणावर जीएमसीत उपचार सुरू असून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सम्राट कॉलनीत मोहित चव्हाण याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम असल्याने त्याठिकाणी व्हीआयपी केटरर्सची आवश्यकता होती. त्यामुळे मोहीतने नाशिक येथील एका एजन्शीशी संपर्क साधून केटरर्स पुरविण्यास सांगितले होते. त्याचे बुकींग करण्यासाठी शनिवारी दुपारी एजन्सीची एक तरुणी जळगावात आली. तिला घेऊन मोहीत हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये जात होते. या दोघांचा पाठलाग करीत दोन दुचाकीस्वारांनी काशिनाथ चौफुलीजवळील थांबविले व सदर तरुणीचे नातेवाईक जळगावात आले असून त्यांच्यासोबत बोलण्यासाठी चला असे सांगून त्यांना शेरा चौकात घेवून गेले. तेथे चार ते पाच जणांनी मोहीतला ‘तरुणीसोबत तुझा काय संबंध, तिला सोबत घेवून कुठे फिरतो’ असा जाब विचारला व आणखी काही जणांना बोलवून घेतले. त्यांनी मोहीतला लोखंडी रॉडने मारहाण करण्यासह व चॉपर सारख्या शस्त्राने वार केले. यात तो रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या