भुसावळ येथे गुरुदेव जेष्ठ नागरिक संघाचा विजय वर्धापन दिन उत्साहात संपन्न
भुसावळ (प्रतिनिधी )भुसावळ येथे श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त उत्साहात संपन्न झाला .
पु .ओ नाहाटा कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते हे होते , तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय सावकारे, सौ रजनी सावकारे, कवियत्री बहिणाबाई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव पाटील, माजी कुलसचिव संभाजीराव देसाई , संघाचे जिल्हाध्यक्ष एस पी महाजन , समाजसेविका आरती चौधरी, रमाकांत पाटील व महादेव हरिमकर उपस्थित होते .
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रथम सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन , वंदे मातरम व इश स्तवन करून करण्यात आला .
त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी संघाचे सचिव महादेव हरिमकर यांनी अहवाल वाचन केले तर तसेच कोषाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी संघटनेचा वार्षीक जमाखर्च सादर केला .
याप्रसंगी आमदार संजय भाऊ सावकारे यांनी ज्येष्ठ नागरिक संघ हा दिशा दाखवण्याचे काम करीत असल्याचे सांगितले , तर संघाचे जिल्हाध्यक्ष महाजन यांनी जेष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली .
या प्रसंगी माजी नगसेवक दुर्गेश ठाकूर यांनी संघाला पाच हजार रुपये देणगी जाहीर केली .
आबासाहेब संभाजी देसाई यांनी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात आनंद प्राप्त करणे हे आपले ध्येय असते असे सांगितले ,तसेच शिवाजीराव पाटील यांनी शहरापेक्षा खेळातील ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती विदारक असून त्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले .
अध्यक्षीय भाषणात प्रकाश विसपुते यांनी भुसावळ येथील गुरुदेव जेष्ठ नागरिक संघ हा विविध उपक्रम राबवत असून कोणत्याही जेष्ठ व्यक्तीला त्रास झाल्यास आम्ही त्यांना सहकार्य करत असल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बि .डी .चौधरी यांनी केले तर आभार एन के पाटील यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक मंडळ अध्यक्ष प्रकाश विसपुते,सचिव महादेव हरीमकर उपसचिव बी डी चौधरी,उपाध्यक्ष एम यू पाटील , आर एल पाटील , खजिनदार रमाकांत पाटील , श्री एन के पाटील , सदस्य पी ओ तायडे , शरद देवरे,सौ लतिका क्षीरसागर , साधना मोहरील , मंगला येवले व कार्यकारीणी मंडळाने परिश्रम घेतले .

